More
  HomeTV9Marathiअशी मुलं केवळ बिल देण्याच्या लायकीचीच...महिलेने सांगितल्या पुरुषांना लुटण्याच्या आयडिया; ट्विटरवर हंगामा

  अशी मुलं केवळ बिल देण्याच्या लायकीचीच…महिलेने सांगितल्या पुरुषांना लुटण्याच्या आयडिया; ट्विटरवर हंगामा

  Viral Video : सोशल मीडियावर दररोज असे व्हिडीओ व्हायरल होतात, जे काहीवेळा मजेदार तर असतात तर काही वेळा ते पण वादालाही कारणीभूत ठरतात. नुकताच असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वास्तविक, प्रियंका त्यागी नावाच्या एका महिला इंस्टाग्राम इन्फ्लूएन्सरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एका महागड्या क्लबमध्ये मुलाकडून बिल कसे भरून घ्यावे ? याबद्दल ती बोलली आहे. मात्र त्यावरून बरीच खळबळ माजली असून ट्विटरवर तर वादाला तोंड फुटलं आहे.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  या व्हिडिओमध्ये ती महिला म्हणते, ‘सर्वप्रथम, एखादी युक्ती लढवून एखाद्या महागड्या क्लबमध्ये प्रवेश मिळवा. मग आजूबाजूला काळजीपूर्वक पहा आणि तुमचं टार्गेट कोण आहे ते लॉक करा. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि त्याच्या जवळूनच जा. नंतर थोडा ॲटीट्यूटने त्याच्यासडे पहा. तुमचं सौंदर्य पाहून तो पाघळेल. तो स्वत:ला चमन छपरी पण तुम्हाला मडोना, सौंदर्यवती समेजल. यानेच तुम्हाला कळेल की तुमचं टार्गेट जाळ्यात अडकलं आहे. ‘

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  ‘त्यानंतर तुमच्या सौंदर्यांची जादू, त्याच्यावर अशी पसरवा की तो बाहेरच पडू शकणार नाही. पण त्याच्यासमोर जास्त येऊ नका उलट लपून त्याची मजा घ्या. जेव्हा तो अधीरतेने तुम्हाला शोधू लागेल तेव्हा समजा की तो जाळ्यात अडकलाय. मग तुमच्या मित्र-मैत्रिणींना बोलवा, ड्रिंक्स मागवा, पार्टी करा… कारण बिल तर तोच (मुलगा) टार्गेट देईल ना. बोनस टीप – अशी मुलं ही फक्त बिल देण्यापुरती असता, दिल ( प्रेमासाठी नव्हे) देण्यासाठी नाही ‘असं तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

  व्हिडीओवरून एकच खळबळ

  खरंतर हा व्हिडिओ गंमत म्हणून बनवण्यात आला आहे. पण @ruchikokcha नावाच्या एका महिलेने हा व्हिडीओ ट्विट करून बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत.’ही प्रियांका त्यागी आहे, जी इन्स्टावर 1M फॉलोअर्ससह सोशल मीडियावर प्रभाव टाकणारी आहे. बिल भरण्यासाठी एखाद्या मुलाला कसे अडकवायचे याचे ट्यूटोरियल ती देत ​​आहे. रीलवर 4.3 दशलक्ष व्ह्यूज आहेत. असे रुचीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे – अशीच पोस्ट जर एखाद्या मुलाने केली असती तर किती गोंधळ माजला असता याची कल्पना करा. आपल्या कायद्यात महिलांसाठी अनेक तरतुदी आहेत ज्या पुरुषांविरुद्ध अनेक खटले दाखल करू शकतात. परंतु पुरुषांना फसवणाऱ्या आणि पैशांची फसवणूक करणाऱ्या महिलांसाठी कोणतीही तरतूद नाही. समान कायद्याची वेळ आली आहे का ? असा सवालही रुचीने त्यावर विचारला आहे.

  रुचीने हिने ही पोस्ट शेअर केल्यावर ती पोस्ट 5,18,000 वर वेळा पाहिली गेली आहे. तसेच त्यावर शेकडो लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. फेमिनिस्ट (लोक) अशा रील्सवर रागावत नाहीत. एखाद्या पुरुष सोशल मीडिया इन्फ्लुएंसने हे केले असते तर गदारोळ झाला असता, असे एका युजरने लिहीले आहे. असा व्हिडिओ बनवणाऱ्या महिलेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही अनेकांनी केली आहे.


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img