More
  HomeMaharashtraMumbai Cityउत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी CM योगी आदित्यनाथ मुंबईत कलाकार, दिग्दर्शकांशी चर्चा...

  उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी CM योगी आदित्यनाथ मुंबईत कलाकार, दिग्दर्शकांशी चर्चा करणार

  मुंबई फिल्म सिटीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी CM योगी आदित्यनाथ आज मुंबईत येऊन कलाकार, दिग्दर्शक यांच्याशी चर्चा करणार आहेत.

  मुंबई : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मुंबई फिल्म इंडस्ट्रीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्येही फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांच्या सरकारने नोएडामध्ये जागाही दिली असून बांधकामांचे काम वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आज मुंबईमध्ये काही अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांची भेट घेणार आहेत. यात अभिनेता अक्षयकुमारचीही भेट मुख्यमंत्री योगी येणार आहेत.

  मुख्यमंत्री योगी स्वत: नोएडामध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी आग्रही आहेत. उत्तर प्रदेशमध्ये उभारलेली फिल्म सिटी मुंबईहून कोणत्याही परिस्थितीत मागे राहू नये, म्हणून योगी आदित्यनाथ मुंबईतील बड्या चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या संपर्कात आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे योगी आदित्यनाथ स्वत: चित्रपटसृष्टी निर्मितीवर मंथन करत आहेत आणि अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत.

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/mumbai/filmcity-in-uttar-pradesh-cm-yogi-in-mumbai-to-meet-senior-directors-and-producer-for-up-film-city-833796

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img