More
  HomeTV9Marathiएलॉन मस्क दुःख सांगणार तरी कुणाला? X बुडण्याची सतावतेय भीती

  एलॉन मस्क दुःख सांगणार तरी कुणाला? X बुडण्याची सतावतेय भीती

  नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2023 : जगातील अब्जाधीश एलॉन मस्क याने मोठ्या उमेदीने ट्विटरची खरेदी केली होती. त्याला सध्या एक्स मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असे नाव देण्यात आले आहे. मस्क एक्स प्लॅटफॉर्मला लोकशाहीचे प्रतिक करण्याचे स्वप्न घेऊन उतरला होता. त्याने ट्विटर खरेदी केल्यावर अनेक बदल केले. बदलाचा अतिरेकच केला म्हणा ना. त्यामुळे अनेक कार्यालये ओस पडली. काही कार्यालये विक्री काढण्यात आली. त्यातील सामान, खुर्च्या विक्री करण्यात आल्या. कर्मचारी सोडून गेले. सब्सक्रिप्शन प्लॅन आल्यानंतर अनेक युझर्स सोडून गेले. पण मस्कच्या प्रयोगांना काही कात्री लागली नाही. या प्रयोगशीलतेची त्याला आता भारी किंमत मोजावी लागत आहे. अनेक जागतिक ब्रँडसने एक्सपासून चार हात लांब राहणे पसंत केले आहे. त्यामुळे एक्स बुडण्याची भीती वाढली आहे.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  का होत आहे नुकसान

  X Platform चे नुकसान होण्यामागे खरेतर एलॉन मस्क याचा अतिरेकी स्वभाव आहेच तर कमकुवत योजना पण आहे. बाजाराचा, कर्मचाऱ्यांचा आणि युझर्सचा विचार न करता, त्याने त्याचा प्लॅन रेटला आणि हा खटाटोप आता त्याच्या अंगलट आला आहे. त्याने अनेक देशात महागडे सब्सक्रिप्शन प्लॅन सादर केले. ही त्याची मोठी चूक ठरली. युरोप आणि आशियातील प्लॅन सारखे ठेवण्याची घोडचूक त्याने केल्याची टीका त्याच्यावर होत होती. अनेक युझर्सने सब्सक्रिप्शनला प्लॅनला विरोध केला. त्यानाराजीने अनेकांनी हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोडला. अनेक जण फेसबूक, इन्स्टाग्रामवर परतले.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  हे सुद्धा वाचा

  मोठ्या ब्रँड्सचा दूरावा

  एप्पल, डिस्ने, आयबीएम आणि Comcast सारख्या अनेक कंपन्यांनी काही दिवसांपासून एक्सपासून दुरावा वाढवला आहे. या कंपन्यांनी एक्सवर जाहिरात देणे थांबवले आहे. जो करार आहे, तो वाढविण्यात या कंपन्यांना स्वारस्य नाही. त्यामुळे मस्क याची चिंता वाढली आहे. नुकतंच त्याने एका कार्यक्रमात काही सीईओंना शिवी हासडली. एलॉन मस्क एक्स प्लॅटफॉर्मवर सातत्याने नियम बदलत असल्याने पण युझर्स कंटाळले आहेत. कर्मचारी पण नाखूष आहेत.

  एलॉन मस्कचा दावा काय

  एलॉन मस्क याला पण जाहिरातीचा महसूल रोडवल्याची जाणीव झाली आहे. त्याने बदलास सुरुवात केली आहे. पण त्याला उशीर झाला आहे. मस्क याच्या दाव्यानुसार, बडे ब्रँड त्याला ब्लॅकमेल करत आहेत. त्यांच्या हिशोबाने ट्विट करण्यासाठी मस्क याच्यावर दबाव वाढवत आहे. त्याने विरोध केल्यानेच या ब्रँड्सनी हात आखडता घेतला आहे. वॉलमार्ट आणि अन्य अनेक ब्रँड्सनी एक्स हे ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म नसल्याची भूमिका घेतल्याने मस्कचे टेन्शन वाढले आहे.


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img