More
  HomeTV9Marathiओदिशा रेल्वे अपघातातील लोको पायलटचे नेमके काय झाले, टक्कर झाली तेव्हा त्यांची...

  ओदिशा रेल्वे अपघातातील लोको पायलटचे नेमके काय झाले, टक्कर झाली तेव्हा त्यांची काय झाली अवस्था

  कोरोमंडल एक्सप्रेसला चुकीचा सिग्नल मिळाल्याने लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीवर धडकली. या मालगाडीत पोलाद भरलेले असल्याने अपघाताची तीव्रता वाढली असल्याचे म्हटले जात आहे.

  ओदिशा रेल्वे अपघातातील लोको पायलटचे नेमके काय झाले, टक्कर झाली तेव्हा त्यांची काय झाली अवस्थाodisha train accident site

  Image Credit source: socialmedia

  दिल्ली : ओदिशा रेल्वे अपघाताचा ( Odisha Train Accident ) हादरा संपूर्ण जगाला बसला. या भयानक अपघातात 275 लोकांचा मृत्यू झाला तर 1100 च्या आसपास जखमी झाले. या अपघाताला इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींगमध्ये ( Electronic Interlocking System ) झालेल्या बदलास जबाबदार मानले जात आहे. रेल्वे बोर्डाच्या सल्ल्याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव  ( Railway Minister Ashwini Vaishnaw ) यांनी हे प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या ताब्यात सोपविली आहे. आता 62 तासानंतर या तीन गाड्यांच्या ड्रायव्हर आणि गार्ड यांची काय अवस्था आहे याबद्दल सामान्य जणांच्या मनात उत्सुकता आहे.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  या भीषण अपघातात दोन्ही ट्रेनचे लोको पायलट ( ड्रायव्हर ) आणि गार्ड जखमी झाले आहेत. मालगाडीच्या इंजिनचे चालक आणि गार्ड देखील एवढ्या भीषण अपघातात वाचले आहेत. सर्वांवर ओदिशाच्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दक्षिण पूर्व रेल्वेच्या खडगपूर डिव्हीजनच्या वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक राजेश कुमार यांनी सांगितले की कोरोमंडळ एक्सप्रेस आणि बंगळुरू-हावडा एक्सप्रेसचे लोको पायलट, सहायक लोको पायलट आणि गार्ड यांची नावे जखमींच्या यादीत होती. सर्व जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  कोरोमंडल एक्सप्रेसचे सर्वाधिक नुकसान

  कोरोमंडल एक्सप्रेसला चुकीचा सिग्नल मिळाल्याने लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीवर धडकली. या मालगाडीत पोलाद भरलेले असल्याने अपघाताची तीव्रता वाढली असल्याचे म्हटले जात आहे. कोरोमंडल एक्सप्रेसचे 21 डबे रुळांवरुन घसरले. आणि तीन डबे शेजारच्या डाऊन ट्रॅकवर पडल्याने उलट बाजूने जाणाऱ्या बंगळुरु- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे डबेही क्षतिग्रस्त झाले. कोरोमंडल एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने सांगितले की ग्रीन सिग्नल पाहून त्याने गाडी पुढे नेली. बंगळुरु- हावडा यशवंतपूर एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने अपघातापूर्वी विचित्र आवाज ऐकल्याचा दावा केला आहे. कोरोमंडळ ट्रेनचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  दोन्ही ट्रेन वेगाने जात होत्या

  बहनगा स्थानकावर दोन्ही ट्रेनला थांबा नसल्याने त्या वेगाने जात होत्या. कोरोमंडळ एक्सप्रेस 128 तर यशवंतपूर एक्सप्रेस 126 किमीच्या वेगाने जात होती. बहनगा बाजार स्टेशनवरुन जाणाऱ्या कोरोमंडल ट्रेनला चुकीचा सिग्नल मिळाला. ती मालगाडीला धडकली आणि तिचे डब्बे रुळांवर पडल्याने उलट दिशेने जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्सप्रेसचे पाठचे दोन डबे कोरोमंडळला धडकले.

  बुधवारसकाळपर्यंत वाहतूक बहाल

  हा अपघात भुवनेश्वर रेल्वे स्थानकापासून सुमारे 171 किमीवर तर खडगपूर स्टेशनपासून 166 किमीवर असलेल्या ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकाजवळ घडला. बचावकार्य पूर्ण झालेले आहे. डब्बेही रुळांवरुन हटविण्यात आले आहेत. रेल्वेमंत्री अपघात स्थळावर ठाण मांडून बसले असून एका मार्गावरील वाहतूक सोमवारी सुरू करण्यात आली आहे. बुधवार सकाळ पर्यंत चारही मार्गावरील वाहतूक बहाल केली जाईल अशी अपेक्षा आहे.


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img