More
  HomeElectionओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात : योगी आदित्यनाथ

  ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात : योगी आदित्यनाथ

  GHMC Election Result 2020: ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. असदुद्दीन ओवेसींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये मोठे उलटफेर झाले असून गेल्यावेळेस तीन जागा मिळवणाऱ्या भाजपने  48 जागांवर विजय मिळवला आहे. 150 जागांपैकी 149 जागांचे निकाल हाती आले आहे. या आकडेवारीनुसार ग्रेटर हैदराबाद पालिका निवडणुकीत भाजपचा 48 जागांवर विजय झाला आहे. तसेच टीआरएसने 55 जागा जिंकल्या असून एमआयएमने 44 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला 2 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. तर अजूनही एका जागेचा निकाल हाती आलेला नाही.

  भाजपाच्या यशानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत हैदराबादच्या जनतेचे आभार मानले आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याबद्दल भाग्यनगरच्या जनतेचे कोटी कोटी आभार.भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात झाली आहे.”

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/india/ghmc-election-result-2020-yogi-adityanath-reaction-on-hyderabad-municipal-corporation-result-835267

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img