सातारा : सहकार क्षेत्रातील मोठी समजली जाणारी कराड जनता सहकारी बॅंकेचा बॅंकींग परवाना रिझर्व्ह बॅंकेने आज रद्द केला. या आलेल्या आदेशामुळे ठेवीदार, सभासदामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनाधिकृत कर्ज वाटप, थकीत कर्ज आणि भ्रष्टाचार या सारख्या आरोपांबाबत बँकेतील एका सभासदाने न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाकडून चौकशी लावण्यात आली होती. या चौकशी दरम्यान बँकेत जवळपास 300 कोटी रुपयांच्या वरती भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर बँकेचे त्यावेळचे संचालक राजेश पाटील वाठारकर यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळावरती गुन्हे दाखल करण्यात आले होते. रिझर्व्ह बॅंकेने परवाना रद्द केल्यानंतर सहकार आयुक्तांनी बॅंकेची दिवाळखोरी जाहीर केली. त्या बॅंकेवर उपनिबंधक मनोहर माळी यांची अवसायानिक म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे.
Read more –