नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel Passes Away) यांचे बुधवारी (25 नोव्हेंबर) पहाटे 3.30 वाजता निधन झालं आहे. त्यांचे सुपूत्र फैजल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. साधारण महिनाभरापूर्वी अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (corona report positive) आला होता. त्यानंतर त्यांचे आरोग्य अधिकच ढासळले होते. जास्त त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. (Senior Congress leader Ahmed Patel passes away)
फैजल पटेल यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज 25 मे रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला”. फैजल पटेल यांनी पुढे लिहिले आहे की, “मी आमच्या सर्व शुभचिंतकांना विनंती करतो की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यदर्शनसाठी येताना गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी”.
Read more –