More
    HomeNationalDelhiकृषी कायद्यांवर पंतप्रधान मोदी म्हणाले, 'नव्या कायद्यांनी शेतकऱ्यांसाठी पर्याय वाढणार, तंत्रज्ञानाशी जुळणार

    कृषी कायद्यांवर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘नव्या कायद्यांनी शेतकऱ्यांसाठी पर्याय वाढणार, तंत्रज्ञानाशी जुळणार

    नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा शेतकरी कायद्याचं समर्थन करत शेतकऱ्यांच्या फायद्याचं असल्याचं म्हटलं आहे. नव्या कायद्यांनी शेतकऱ्यांना पर्याय वाढणार आहेत. तसेच शेतकरी तंत्रज्ञानाशी जुळणार आहे, असं मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी आज फिक्कीच्या 93व्या वार्षिक आमसभा आणि वार्षिक संमेलनाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण 20-20 सामन्यांमध्ये खूप काही वेगाने बदलताना पाहिलं आहे. 2020 वर्षानेही सर्वांवर मात केली आहे. जग आणि देशात एवढे चढउतार या वर्षात पाहायला मिळाले. काही वर्षांनंतर आपण जेव्हा कोरोनाकाळाबाबत विचार करु त्यावेळी आपल्यालाही विश्वास बसणार नाही, अशा गोष्टी घडल्या आहेत. मात्र चांगली गोष्ट ही आहे की, जेवढ्या वेगाने परिस्थिती बिघडली तेवढ्याच वेगाने स्थिती सुधारत देखील आहे.

    Read more –

    https://marathi.abplive.com/news/india/pm-narendra-modi-inaugurates-the-93rd-annual-general-meeting-modi-says-new-farm-bill-new-laws-will-give-farmers-more-options-837845

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img