More
  HomeABP Live Marathiकोल्हापूर : पोलिसांची व्हॅन बंद पडली, आरोपींसह दोन किलोमीटर पायपीट! भोंगळ कारभार...

  कोल्हापूर : पोलिसांची व्हॅन बंद पडली, आरोपींसह दोन किलोमीटर पायपीट! भोंगळ कारभार चव्हाट्यावर


  Kolhapur Police : इचलकरंजीतील अट्टल सराईत गुंड अजित नाईकला मोका कारवाईत जामीन मिळाल्यानंतर त्याची मिरवणूक काढल्याप्रकरणी पाच संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, यावेळी कोल्हापूर पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी जात जुना राजवाडा पोलिसांची व्हॅन बंद पडली. मात्र, यावेळी पर्यायी खासगी वाहन किंवा दुसरे वाहन बोलावून आरोपींना हजर करता आले असते. मात्र, पोलिसांनी   पायपीठ करत आरोपींना न्यायालयात हजर केले. या दोन किमीमध्ये संशयित आरोपींनी पोबारा करण्याचा प्रयत्न केला असता, तर नाचक्की कोल्हापूर पोलिसांचीच होणार होती. मात्र, सुदैवाने असा कोणताही प्रकार घडला नाही. 

  दरम्यान, संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून आणखी सात जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दुसरीकडे गुंड अजित नाईकच्या सुटकेनंतर त्याच्या 35 ते 40 चेल्यांनी मिरवणूक काढली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडून पाच संशयितांना अटक करण्यात आली. त्यानंतर संशयितांना जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. न्यायालयाच्या दिशेने जात असतानाच पोलिसांची व्हॅन सेंट झेवियर्स हायस्कुलसमोर बंद पडली. येथून न्यायालयात आरोपींना हजर करण्यासाठी पर्यायी वाहनाचा वापर करणे सहज शक्य होते. मात्र, संशयितांसोबत पोलिसांनी सुद्धा पायपीठ करत न्यायालय गाठले. 

  मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेल्या बॅनरवर खून, मारामाऱ्या, विनयभंग प्रकरणातील अट्टल ‘भास्कर’ प्रकटला!

  दरम्यान, कोल्हापूर शहरात बुधवारी खून, मारामारी, खंडणी, अपहरण, विनयभंग, सावकारी प्रकरणतील अट्टल सराईत गुंड अमोल भास्कर मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर झळकल्याने संतापाचा कडेलोट झाला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कोल्हापुरातील प्रमुख नेते राजेश क्षीरसागर यांना वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी शहरात फलक लावण्यात आले होते. या फलकावर अट्टल भास्कर प्रकट झाल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या. अनेक चौकात बॅनर लावण्यात आले होते. 

  गुंडाचे फलक झळकल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने बॅनर उतरण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर गुंड अमोल भास्करने महापालिकेची परवानगी घेऊन लावल्याचे समोर आले. त्यानंतर काही फलक उतरवण्यात आल्यानंतर पुन्हा लावल्याची माहिती आहे. मोकातून अमोल भास्करची एक महिन्यांपूर्वी सुटका झाली आहे.

  News Reels

  इतर महत्वाच्या बातम्या 

  {if(_fireSc){var c=document.createElement(“script”);c.src=”//asset.fwpub1.com/js/embed-feed.js”,c.async=!0,document.getElementsByTagName(“head”)[0].appendChild(c),_fireSc=!1}}));]]>

  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img