More
  HomeCorona'कोविशील्ड'वरील आक्षेप सीरमने फेटाळले; तक्रारदारावर १०० कोटींचा दावा ठोकणार

  ‘कोविशील्ड’वरील आक्षेप सीरमने फेटाळले; तक्रारदारावर १०० कोटींचा दावा ठोकणार

  पुणे: ‘कोविशील्ड’ लसीवर चेन्नईतील एका स्वयंसेवकाने घेतलेले आक्षेप ‘सीरम’ इन्स्टिट्यूटनं स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. ‘संबंधित स्वयंसेवकाचे आरोप हे कुहेतूने केलेले व दिशाभूल करणारे आहेत. त्यामुळं संस्थेची बदनामी झाली असून त्याच्याविरोधात आम्ही १०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल करणार आहोत,’ असं ‘सीरम’नं स्पष्ट केलं आहे. (Covishield in Serum Institute)

  ‘कोव्हिशील्ड’ ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-अमेरिकी कंपनी ‘अॅस्ट्राझेनेका’ विकसित करीत आहेत. भारतात त्याचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारीच सीरमला भेट देऊन संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला होता. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या सुरू आहे. मात्र, या लसीच्या प्रायोगिक डोसमुळं आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम झाल्याचा आरोप चेन्नईतील स्वयंसेवकानं केला होता. या लसीच्या चाचण्या तातडीनं थांबवाव्यात व आपल्याला पाच कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी,’ अशी मागणीही त्यानं केली होती.

  ‘सीरम’ तात्काळ पत्रक प्रसिद्धीला देऊन संबंधित स्वयंसेवकाचे आरोप खोडून काढले आहेत. ‘तक्रारदाराने नोटिशीद्वारे केलेले आरोप दिशाभूल करणारे आहेत. स्वयंसेवकाच्या प्रकृतीत बिघाड झाल्याबद्दल आम्हाला सहानुभूती नक्कीच वाटते; परंतु त्याच्या प्रकृतीतील बिघाडाचा आणि लसीचा काहीही संबंध नाही. त्यामुळं त्यानं लसीवर खापर फोडणं हा निव्वळ खोटारडेपणा आहे. त्यांना जाणवणारा त्रास लसीमुळे होत नसल्याची पूर्ण कल्पना वैद्यकीय पथकाने त्याला दिली होती, तरीही त्यानं याबाबतीत जाहीर आरोप करण्याचा मार्ग अनुसरला. त्याच्या या कृत्यामुळं संस्थेची बदनामी झाली आहे. पैसे उकळण्याच्या हेतूनं त्यानं हे कृत्य केल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळं आम्हीच त्यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा करणार दाखल आहोत,’ असं ‘सीरम’नं म्हटलं आहे.

  read more-

  https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/serum-to-file-rs-100-crore-case-after-mans-vaccine-trial-distress-claim/articleshow/79487623.cms

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img