More
  HomeTV9Marathi'खिसियानी बिल्ली खंभा नोचे', प्रफुल्ल पटेल यांचा खोचक शब्दांत निशाणा कुणावर?

  ‘खिसियानी बिल्ली खंभा नोचे’, प्रफुल्ल पटेल यांचा खोचक शब्दांत निशाणा कुणावर?

  गजानन उमाटे, Tv9 मराठी, नागपूर | 12 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर नुकताच निकाल जाहीर केला. या निकालात विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा दिलासा दिला. या निकालावरुन ठाकरे गट आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जातोय. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक शब्दांमध्ये विरोधकांवर निशाणा साधला. “ही एक न्यायीक प्रक्रिया आहे. निवडणूक आयोग आणि कोर्ट हे सुद्धा ज्यूडीशीयल प्रक्रिया आहे. त्या निर्णयावर भाष्य करणे किंवा टीका करणे हे योग्य नाही. ‘खिसियानी बिल्ली खंभा नोचे’ अशी हिंदीत म्हण आहे. अशी पोटदुखी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे विरोधक बेछूट आरोप करत आहेत. ते योग्य नाही. सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल विधानसभा अध्यक्षांनी द्यावा असं सांगितलं. याचा अर्थ अधिकार स्पिकरकडे आहे. त्याला सुप्रीम कोर्ट मान्य करतं”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  शिवसेना निकालाचेच निकष राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणात लागू होतील का? अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. याबाबत प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. “अजित पवार यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारून नेतृत्व करावे. हा निर्णय पक्षात आलेले पदाधिकारी आणि निवडून आलेल्या जनप्रतिनिधींनी बहुमतांनी घेतलाय. आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये गेलो. आम्ही निवडणूक आयोगात याचिका दाखल केली. आमची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केस वेगळी आहे”, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

  लोकसभा निवडणुकीत अजित पवार, शिंदे छोट्या भावाच्या भूमिकेत?

  आगामी काळात लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. ही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी महत्त्वाची आहे. भाजप पक्ष या निवडणुकीत पुन्हा जिंकून आला तर भाजपला विजयाची हॅट्रीक साजरी करण्याचं भाग्य मिळणार आहे. पण विरोधकांच्या इंडिया आघाडीने मजल मारली तर भाजपच्या हातून सत्ता जाऊ शकते. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूच्या पक्षांसाठी ही निवडणूक ‘करो या मरो’ या धर्तीवरची असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. या निवडणुकीत महायुतीचं जागावाटप कसं असेल? असा प्रश्न प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  “आमची जागावाटपाबाबत चर्चा झालेली नाही. पण 15 दिवसात नक्कीच आम्ही बसून ठरवू. भाजप नक्कीच मोठा पक्ष आहे. त्यांचे 23 खासदार आहेत. त्याप्रमाणे आम्ही चर्चा करुन निर्णय घेऊ. एक गोष्ट नक्की मान्य करावे लागेल. सर्वात जास्त भाजपचे खासदार असल्याने त्यांचं नेतृत्व असणार आहे. आम्ही कुठल्याही गटाचे असलो तरी सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहरा मान्य करुन लोकसभा निवडणुकीला सामोरे जाऊ. जागावाटपाबाबत तीनही पक्षांनी एकमेकांना साथ देण्याचं ठरवलं आहे”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img