More
    HomeNationalMaharashtraगुन्हेगारीत पाटण्यानंतर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर; मुंबई आणि पुणे कोणत्या स्थानी?

    गुन्हेगारीत पाटण्यानंतर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर; मुंबई आणि पुणे कोणत्या स्थानी?

    नागपूर : ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जाणाऱ्या नागपूर शहरात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी वाढली. त्यानंतर क्राईम सिटी म्हणूनही नागपूरला संबोधलं गेलं. आता गुन्ह्यांच्या बाबतीत नागपूरने राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात अहवाल जारी केला आहे.

    नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार वर्ष 2019 मध्ये दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणात नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत बिहारची राजधानी पाटणा प्रथम क्रमांकावर आहे.

    पाटण्यात दर एक लाख लोकसंख्येमागे 4.7 हत्या झाल्या आहेत, तर नागपुरात दर एक लाख लोकसंख्येमागे 3.6 हत्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे महानगर असलेल्या दिल्लीत हे प्रमाण 3.1, जयपूरमध्ये 3.0, लखनौमध्ये 2.6 एवढं आहे.

    या बाबतीत देशातील पहिल्या 20 शहरांमध्ये मुंबई आणि पुण्याचाही समावेश आहे. पुणे तेराव्या तर मुंबई सतराव्या स्थानावर आहे. पुण्यात दर एक लाख लोकसंख्येमागे 1.5 हत्यांची प्रकरणं समोर आली आहे. तर महानगरी मुंबईत हे प्रमाण अवघे 0.9 एवढे आहे.

    या अहवालावरुन नागपुरातील गुन्हेगारी किती वाढली याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे उपराजधानी नागपूर आता गुन्ह्यांच्या बाबतीत पाटण्यासोबत स्पर्धा करत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झालं आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img