विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. दोघे आज म्हणत असतील काश आज ईव्हीएम होता, असं मुश्रीफ म्हणाले.
कोल्हापूर : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारल्यानंतर आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “दोघेही म्हणत असतील की काश आज ईव्हीएम मशीन होता,” असं मुश्रीफ म्हणाले. तसंच मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर सत्य समोर येते असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला.
Read more –