More
  HomeABP Live Marathiजगातील सर्वात मोठ्या विमानांची मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्रँड एन्ट्री

  जगातील सर्वात मोठ्या विमानांची मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्रँड एन्ट्री


  Airbus Beluga plane : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) जगातील सर्वात मोठे विमान उतरले. ‘एअरबस बेलुगा’  (Airbus Beluga) असं या  नागरी उपयोगासाठी असणाऱ्या विमानाचं नाव आहे.  या विमानाबरोबरच प्रवासी वाहतुकीत जगात सर्वाधिक अत्याधुनिक असलेले ‘एम्ब्रेअर ई 192-ई2’ (Embraer E192-E2) प्रॉफिट हंटर हे विमानदेखील मंगळवारी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे. या दोन्ही मोठ्या विमानांची मुंबई विमानतळावर पहिली ग्रँड एन्ट्री झाली.

  दरम्यान, एअरबस कंपनीचे ‘ए300-600 एसटी’ हे ‘बेलुगा’ नावे ओळखले जाणारे विमान 51 टन मालवाहू क्षमतेसह जगातील सर्वात मोठे विमान आहे. वैमानिक खाली व विमानाचा मुख्य भाग त्याच्या वर आहे. खालील भागापेक्षा दुप्पटीने वरचा भाग मोठा आहे. अत्यंत वेगळ्या आकारातील हे विमान आहे. नागरी उपयोगातील अॅन्तोनोव्ह कंपनीचे ‘एएन 124’ व ‘एएन 225’, ही दोन विमाने सर्वाधिक मोठी होती. या दोघांची सामान वाहून नेण्याची क्षमता ही 171 व 250 टन आहे. या तोडीचे अन्य कुठलेही विमान आतापर्यंत अस्तित्वात नव्हते. ‘एएन 225’ विमानाने दिल्ली मेट्रोसाठीचे डबे आणले गेले होते. 

  40 हजार 700 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता 

  एअरबस बेलुगा या विमानाला अधिकृतपणे Airbus A300-608ST (सुपर ट्रान्सपोर्टर) असे म्हणतात. याला बेलुगा म्हणतात कारण त्याची रचना बेलुगा व्हेल माश्यासारखी आहे. या बेलुगा एअरबस सुपर ट्रान्सपोर्टर विमान जगातील सर्वात मोठे विमान आहे. बेलुगा एअरबसचे पहिले उड्डाण 13 सप्टेंबर 1994 रोजी झाले होते. एअरबसने 1992 ते 1999 दरम्यान अशी केवळ पाच विमाने बनवली आहेत. एवढे मोठे विमान फक्त दोन पायलट उडवतात. हे विमानामध्ये 40 हजार 700 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. हे विमान 184.3 फूट लांब आणि 56.7 फूट उंच आहे. जेव्हा ते पूर्णपणे रिकामे असते तेव्हा त्याचे वजन 86,500 किलो असते. 

  News Reels

  प्रति तास  864 किलोमीटरचा वेग

  बेलुगा एअरबसचा वेग प्रचंड आहे. या विमानाचा कमाल वेग 864 किलोमीटर प्रति तास आहे. ते एकावेळी जास्तीत जास्त 27 हजार 779 किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते. कमाल 35 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते. 

   

  महत्त्वाच्या बातम्या:

  बापरे! उंच आकाशात विमानांची धडक; अंगावर काटा आणणारी थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

  {if(_fireSc){var c=document.createElement(“script”);c.src=”//asset.fwpub1.com/js/embed-feed.js”,c.async=!0,document.getElementsByTagName(“head”)[0].appendChild(c),_fireSc=!1}}));]]>

  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img