शिर्डी : साईबाबा संस्थानच्या ड्रेसकोडबाबत भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर आता या फलकावरून वाद निर्माण झाला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी संस्थानने त्वरित बोर्ड हटविण्याची मागणी केली असून तो नाही हटवला तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तृप्ती देसाई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार त्या आज शिर्डीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर आज सकाळपासून शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मंदिर परिसरात लावलेल्या फलकांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिर्डी संस्थाननं केलेल्या ड्रेस कोडविरोधात आज तृप्ती देसाई थेट शिर्डीत जाऊन बोर्ड काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. अहमदनगर पोलीस त्यांना सीमेवरच रोखण्याची शक्यता आहे
Read more –