मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अनेक विविध सिनेमाची चर्चा सुरु आहे. कोणता सिनेमा महागडा ठरतोय.. कोणता सिनेमा सगळ्यात लार्जर दॅन लाईफ टरतोय याची चर्चा होते आहे. यात काही सिनेमांची आवर्जून नावं घेतली जातायत. अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र हा त्यापैकीच एक. सध्या या सिनेमाचं बजेट 300 कोटींच्या पुढे गेलं आहे. तर दुसरीकडे एस एस राजामौली महाभारत बनवू लागले आहेत. तोही सिनेमा बराच खर्चिक असणार आहे. तर आदिपुरुष हा ओम राऊत यांचा प्रभासची मुख्य भूमिका असलेला चित्रपटही मोठा असणार आहे. तर या सगळ्यात कडी आहे ती अश्विन नाग यांच्या नव्या सिनेमाची.
अश्विन नाग यांच्या या सिनेमात दीपिका पडुकोण आणि प्रभास यांच्या मुख्य व्यक्तिरेखा आहेत. आधी प्रभासला घेतानाच त्याला नेहमीच्या मानधनापेक्षा जास्त मानधन देऊन घेतल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर दीपिका पडुकोणनेही या सिनेमाला होकार देताना बक्कळ मानधन आकारल्याचं कळलं. आजवर कोणाही अभिनेत्रीने कधी घेतलं नाही इतकं मानधन तिने घेतलं. ही रक्कम जवळपास 12 कोटींच्या घरात जाते. आजवर कोणाही अभिनेत्रीला इतकी रक्कम मिळालेली नाही. पण दीपिकाचं फेम आणि तिच्या कामाची पद्धत लक्षात घेऊन या चित्रपटात तिला साईन केलं गेलं. प्रभास आणि दीपिका ही पहिल्यांदाच चित्रपटाचा स्क्रीन शेअर करणार आहेत.
Read more –