कोल्हापूर: पुणे शिक्षक मतदार संघातून काँग्रेसला उमेदवारी मिळावी म्हणून पहिल्यापासून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आग्रही होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्याकडे एका भर सभेत सतेज पाटील यांनी कोल्हापूरला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की तुम्ही फक्त उमेदवार द्या निवडून आणण्याची जबाबदारी माझी राहील. काल निकालानंतर सतेज पाटील यांनी आपले शब्द खरे करून दाखवले. शिक्षक मतदार संघातून काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर निवडून आले आहेत.
आसगावकर हे मूळचे कोल्हापूरचे असून पहिल्यापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. वेगवेगळ्या व्यासपीठांवर शिक्षकांची कामं ते करत असतात. पाच जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते या निवडणुकीत जिद्दीनं बाहेर पडल्याचे दिसून आले आहे. जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विश्वजित कदम आदी नेत्यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला. महाविकास आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई झाली
Read more –