More
    HomeMaharashtraAkolaदिल्ली, राजस्थान, गुजराथ व गोवा राज्यातून अकोला जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली

    दिल्ली, राजस्थान, गुजराथ व गोवा राज्यातून अकोला जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली

    अकोला,दि. 26 (जिमाका)- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात दि. 25 नोव्हेंबर 2020 पासून दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून अकोला जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तिंसाठी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी एक आदेशाद्वारे नियमावली जारी केली आहे.

    रेल्वे प्रवाशांसाठी नियमावली

    दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून अकोला जिल्ह्यात रेल्वेव्दारे येणाऱ्या प्रवाशांनी RTPCR चाचणी केल्याचा निगेटीव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील, रेल्वेने महाराष्ट्रात प्रवेश करण्याच्या 96 तासांच्या आत RT-PCR चाचणी करीता नमुने घेण्यात यावेत, ज्या प्रवाशांना RT-PCR चाचणी केल्याबाबतचा अहवाल नसेल अशा प्रवाशांची स्क्रिनींग करून तापमान मोजण्यात यावे, याबाबतची जवाबदारी रेल्वे विभागाची राहील, लक्षणे नसलेल्या प्रवाशांना घरी जाण्याची मुभा राहील, लक्षणे असलेल्या प्रवाशाना विलगीकरण करण्यात यावे किता गृह अलगीकरण करण्यात यावे व त्यांची Antigen चाचणी करण्यात यावी व  सदर चाचणीचा अहवाल निगेटीव्ह (Negative) आल्यास अशा प्रवाशांना घरी जाण्याची मुभा राहील. जे प्रवाशी कोविड चाचणी करणार नाहीत किवा बाधित आढळुन आल्यास अशा प्रवाशांना नियमानुसार जवळच्या कोवड केअर सेंटर(CCC) मध्ये भर्ती करण्यात यावे व त्याबाबतचा खर्च संबंधित प्रवाशाकडून वसुल करण्यात यावा, त्याच प्रमाणे वरील राज्यामधुन येणाऱ्या प्रवाशांची तपासणी आरक्षीत सुचिनुसार संबंधित कोचमध्ये नियूक्त केलेल्या टि.सी यांनी करावी.

    रस्ते प्रवाशांसाठी नियमावली

    दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करून तापमान मोजण्याकरीता संबधीत तहसिलदार तथा इंसीडेट कमांडर, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद याचे पथकांनी सदर बाबतीत संपुर्ण नियोजन करुन आवश्यक ती कार्यवाही करावी.  लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा, ज्या प्रवाशाना लक्षणे आहेत  अशा प्रवाशांना परत माघारी जाण्याचा पर्याय असेल, लक्षणे असलेल्या प्रवाशांची  Antigen चाचणी करण्यात यावी व या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह  आल्यास अशा प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा राहील, जे प्रवाशी कोविड चाचणी करणार नाहीत किंवा बांधित आढळुन आल्यास अशा प्रवाशांना नियमानुसार जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये भर्ती करण्यात यावे व त्याबाबतचा खर्च संबधित प्रवाशांकडून वसुल करण्यात यावा, तसेच सर्वसामान्य नागरिकांनी वरील राज्यातुन त्यांचेकडे येणाऱ्या प्रवाशांची माहिती स्थानिक प्रशासनाला देणे बंधनकारक राहील.

    दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातुन जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांना तालुकास्तरीय नियंत्रण कक्षात व महानगरपालीका क्षेत्रात महानगरपालीका येथील नियंत्रण कक्षात माहीती देणे बंधनकारक आहे. माहीती न देणाऱ्या प्रवाशांवर नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. या चार राज्यातुन येणाऱ्या  प्रवाशाची तपासणी झालेली नसल्यास त्याच्या तपासणीची व्यवस्था जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून करण्यात यावी.  या चार राज्यात आलेल्या प्रवाशाची माहीती रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनास कळविणे बंधनकारक राहील.

    कोविड-19 चे अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. तसेच निर्गमित केलेले आदेशांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी,असेही आदेशात म्हटले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img