मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : नव्या युगाचा वाहतूकीचा एक पर्याय म्हणून राज्य सरकारने मुंबई ते पुणे अल्ट्रा फास्ट हायपरलूप प्रोजेक्टची घोषणा केली होती. या हायपर लूप तंत्रज्ञानाने मुंबई ते पुणे हे अंतर दर ताशी 496 या प्रचंड वेगाने अवघ्या 20 मिनिटांत संपेल असे म्हटले जात होते. परंतू सध्या देशात हायस्पीड हायपरलूप ( Hyperloop Train ) सुरु होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. सारस्वत यांनी रविवारी स्पष्ट केले आहे. हे तंत्रज्ञान परिक्वतेच्या सर्वात खालच्या पातळीवर असून सध्या ते आर्थिक रुपाने व्यवहार्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>
व्हर्जिन हायपर लूप तंत्रज्ञान आणि त्याची व्यावसायिक व्यवहार्यता तपासण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे सारस्वत अध्यक्ष आहेत. त्यांनी म्हटले की काही विदेशी कंपन्यांनी भारतात हायपरलूपचे तंत्रज्ञान आणण्यात रस दाखविला आहे. एका मुलाखतीत सारस्वत म्हणाले की आपल्या देशात हायपर लूपसाठी परदेशातून जे प्रस्ताव आले, ते जास्त व्यवहार्य पर्याय नाहीत. हे तंत्रज्ञान अजूनही खूपच प्राथमिक अवस्थेत आहे.
व्ही.के.सारस्वत यांनी म्हटले की आम्ही आजच्या स्थितीत याला जास्त महत्व देत नाही. या तंत्रज्ञानाला केवळ अभ्यासाच्या पातळीवर पाहीले जात आहे. मला वाटत नाही की निकटच्या भविष्यात हायपर लूप तंत्रज्ञान आपल्या परिवहन व्यवस्थेचा भाग होईल.
960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>
हायपरलूप ट्रेन म्हणजे काय ?
हायपरलूप एक हायस्पीड ट्रेन असून जी ट्यूबच्या निर्वांत पोकळीत धावते. इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्ला आणि अंतराळ प्रवास कंपनी स्पेसएक्सची मालकी असलेल्या अब्जाधीश इलॉन मस्क यांचे हे प्रस्तावित तंत्रज्ञान आहे. व्हर्जिन हायपरलूपची पहिली चाचणी 9 नोव्हेंबर 2020 रोजी अमेरिकेतील लास वेगास येथे 500 मीटरच्या ट्रॅकवर एका पॉडआधार केली होती. यात एक भारतीय आणि अन्य प्रवासी होते. याचा वेग 161 किलोमीटर प्रति तास इतका होता.
Source