More
  HomeTV9Marathiनवनीत राणांची डोकेदु:खी वाढणार? बच्चू कडू यांच्यानंतर राष्ट्रवादीचा अमरावती मतदारसंघावर दावा!

  नवनीत राणांची डोकेदु:खी वाढणार? बच्चू कडू यांच्यानंतर राष्ट्रवादीचा अमरावती मतदारसंघावर दावा!

  अमरावती लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात आधीच प्रहारचे संघटनेचे आमदार बच्चू कडू उमेदवार देणार असल्याच्या तयारीत आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही याच मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे.

  नागपूर : अमरावती लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात आधीच प्रहारचे संघटनेचे आमदार बच्चू कडू उमेदवार देणार असल्याच्या तयारीत आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही याच मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांच्यासमोर आता पेच निर्माण झाला आहे. “राष्ट्रवादीने लढलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या जागेची चाचपणी करण्यासाठी पवार साहेब विभागवार बैठका घेत आहेत, विदर्भातंही बैठका होणार असल्याचं अनिल देशमुख म्हणाले.अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीची आहे, त्यामुळे तिथे चाचपणी सुरु आहे. तसेच अमरावरती लोकसभावर कॅाग्रेसचाही दावा आहे, पण वरिष्ठ स्तरावर चर्चा झाल्यानंतर मतदारसंघ अदलाबदल करण्याबाबत निर्णय होईल”, असं देशमुख म्हणाले. “अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करुन नवनित राणा विरोधात उमेदवार देणार”, असं अनिल देशमुख म्हणाले.  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img