More
  HomeCoronaपंतप्रधान नरेंद्र मोदींसह १०० राजदूत पुण्यात येणार; कोरोनाची लस बनवणाऱ्या "सीरम"ला भेट...

  पंतप्रधान नरेंद्र मोदींसह १०० राजदूत पुण्यात येणार; कोरोनाची लस बनवणाऱ्या “सीरम”ला भेट देणार

  पुणे : संपूर्ण जागाचे लक्ष सध्या कोरोनावरील लस तयार करणाऱ्या पुण्यातील ” सीरम  इन्स्टिट्यूट ” कडे लागले आहे. यासाठीच थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तब्बल शंभर देशाचे राजदूत शुक्रवार (दि.27) पुणे दो-यावर येत असून, पुण्यातील सीरम  इन्स्टिट्यूटला भेट देऊन आढाव घेणार आहेत. याबाबत प्रशासनामध्ये हालचाली सुरु झालेल्या आहेत.

  राजदूतांच्या दौर्‍याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठक घेतली आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. राजदूतांचा दौराही प्रशासनाला प्राप्त झाला आहे.  शंभर राजदूत 27 नोव्हेंबरला सीरमला भेट देणाार असून,  नरेंद्र मोदींचा दौरा अद्याप आलेला नसून,  28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांच्याकडे सांगण्यात आले आहे. याबाबत प्रशासनाने तयारी सुरु केलेली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना व्हायरसवरील लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे.केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना या भेटीची माहिती देत तिचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी राव यांच्यासह पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याशी चर्चा करून ‘मिनिट टू मिनिट टू’ कार्यक्रम निश्चित केला आहे. दिल्ली येथून विमानाने 98 देशांचे राजदूत लोहगाव विमानतळाच्या टेक्निकल एरिया येथे दाखल होणार आहेत. तर, रशिया आणि सौदी अरेबियाचे राजदूत मुंबईहून पुण्यात येणार आहेत.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img