More
    HomeNationalMaharashtraपुण्यातील हवेली तालुक्यातील शिंदवणे घाटात ढगफुटीसदृश्य पाऊस, आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    पुण्यातील हवेली तालुक्यातील शिंदवणे घाटात ढगफुटीसदृश्य पाऊस, आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    पुणे – सोलापुर महामार्गावर असलेल्या या उरळी कांचनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी तिथं तळ ठोकून आहेत.

     पुण्यापासून साधारणपणे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उरळी कांचन परिसरात रविवारी दुपारी ढगफुटी झाल्याने बाजारपेठेत मोठमोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे.

    उरळी कांचनपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वळती घाटात रविवारी दुपारी चार ते संध्याकाळी सहा या वेळेत ढगफुटी झाल्याने वळती आणि शिंदवणे या गावात असलेल्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून हे दोन्ही बंधारे फोडून पाण्याला वाट करुन देण्यात आली. त्यामुळे या गावांमधून उरळी कांचनला जाणाऱ्या ओढ्याला पुर आला. या पुरामुळे ओढ्याच्या काठावरील अवैध बांधकामं आणि अतिक्रमणांना मोठा फटका बसला. अनेक घरांमध्य पाणी शिरलं. पुढं हे पाणी उरळी कांचनमधे घुसलं आणि संपूर्ण शहरात पसरलं.

    पुणे – सोलापुर महामार्गावर असलेल्या या उरळी कांचनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी तिथं तळ ठोकून आहेत. गेल्याच आठवड्यात पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले होते.

    https://marathi.abplive.com/news/pune/heavy-rain-fall-in-urali-kamchan-pune-818868

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img