More
  HomeTV9Marathiपुण्यात उच्चभ्रू सोसायटीत हाणामारी, तरुणाचा डोळाच फोडला, कारण...

  पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत हाणामारी, तरुणाचा डोळाच फोडला, कारण…

  अभिजित पोते, पुणे, दि.29 डिसेंबर | पुणे शहर हे सुस्कृंत लोकांचे शहर म्हटले जाते. पुण्यातील लोकांची चर्चा देशपातळीवर होत असतात. मात्र चर्चांना गोलबोट लागणारी घटना पुण्यात घडली आहे. उच्चभ्रू म्हटल्या जाणाऱ्या एका सोसायटीमध्ये सदस्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत एकाचा डोळा फुटला. मग हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. सोसायटीच्या जीममध्ये व्यायम का करतो? यावरुन दोन सदस्यांमध्ये हा प्रकार झाला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एलिना लिव्हिंग सोसायटीत ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(“desktop_top_300x250”); }); }]]>

  काय घडला प्रकार

  पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एलिना लिव्हिंग सोसायटीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. या सोसायटीमध्ये ए, बी, सी, डी, ई अशा अनेक विंग आहेत. या सोसायटीमध्ये आधी एकच जिम होती. त्यावेळी मर्यादित विंग होती. त्या विंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी त्याचा वापर होत होता. मात्र सोसायटीमधील विंग वाढल्यावर या जिमचे स्थलांतर झाले आणि ती सगळ्यांसाठी उपलब्ध झाली. २६ डिसेंबर रोजी रात्री संदीप अग्रवाल व्यायामासाठी सोसायटीच्या जीममध्ये गेले. त्यावेळी त्यांचे तिथे असलेल्या अनेक सभासदांशी वाद झाले.

  960) { googletag.cmd.push(function() { googletag.display(‘desktop_medium_300x250’); }); }]]>

  हे सुद्धा वाचा

  …अन् सुरु झाली हाणामारी

  ही जिम सोसायटीमधील ए आणि बी विंगसाठी नाही, तुम्ही बाहेर जा, असे तिथे असलेल्या सभासदांनी त्यांना सांगत अरेरावी केली. या दरम्यान रुपेश चव्हाण नावाच्या त्या सदस्याने अगरवाल यांना मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी चव्हाण यांनी अगरवाल यांच्या डोळ्यावर जोरात फटका मारला. त्यानंतर अगरवाल खाली पडले. त्यांच्या डोळ्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. त्यांच्या पत्नीने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अगरवाल यांची पत्नी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रुपेश चव्हाण असे आरोपीचे नाव असून कोंढवा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img