More
    HomeNationalप्रवाशांनो लक्ष द्या...! 1 डिसेंबरपासून बंद होणार सर्व ट्रेन? रेल्वे मंत्रालयानं दिलं...

    प्रवाशांनो लक्ष द्या…! 1 डिसेंबरपासून बंद होणार सर्व ट्रेन? रेल्वे मंत्रालयानं दिलं असं उत्तर

    नवी दिल्ली – आपण 1 डिसेंबरनंतर कुठे जाण्याचा विचार करत आहात? रेल्वेचे रिझर्व्हेशन केले आहे? जर असे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या WhatsAppवर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये 1 डिसेंबरपासून रेल्वे, कोविड-19 विशेष रेल्वेगाड्यांसह सर्वच रेल्वे गाड्या बंद करणार असल्याचे म्हटले गेले आहे. मात्र, आपल्याकडेही अशा प्रकारचा एखादा मेसेज आला असेल, तर त्याकडे लक्ष देण्याची आश्यकता नाही. कारण हा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे समोर आले आहे.

    खुद्द भारत सरकारची संस्था पीआयबीने या व्हायरल मैसेजच्या सत्यतेची पडताळणी करत खुलासा केला आहे. तर जाणून घेऊयात या मेसेज मागची सत्यता…

    संबंधित मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे, की रेल्वे, कोविड-19 विशेष रेल्वे गाड्यांसह सर्व रेल्वे गाड्या 1 डिसेंबरनंतर बंद करणार आहे. मात्र, “सध्या सरकारचा असा कुठलाही विचार नाही. तसेच हा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. PIBFactCheckने दावा केला आहे, की 1 डिसेंबरनंतर रेल्वे सेवा बंद करण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. रेल्वेनेही यासंदर्भात माहिती दिली आहे.

    Read more –

    https://www.lokmat.com/national/pib-fact-check-covid-19-special-trains-stop-operating-after-1st-december-a653/

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img