अर्जेंटिना : आपल्या स्वतःच्या खास शैलीत फुटबॉल विश्वाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार्या डिएगो मॅराडोना यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय 60 वर्षांचे होते.
अर्जेंटिनाचे माजी फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांनी अगदी सामान्य घरातून येत फुटबॉल विश्वामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तर अर्जेंटिना या देशाला जागतिक पातळीवर नेऊन पोहोचविले. त्यांची अफलातून गोल करण्याची पद्धत सर्वांनाच भुरळ घालणारी होती.
डिएगो मॅराडोना यांनी जगभरातील फुटबॉल चाहत्यांवर अनेक दशके राज्य केले. मात्र त्यांच्या हृदयविकाराने निधन झाल्याने फुटबॉल विश्वास शोककळा पसरली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये विविध संघाकडून खेळताना एकूण 259 बोल केले आहेत. त्यांचे निधन फुटबॉल विश्वाला मोठा धक्का देणारे ठरले.