More
  Homecrime newsफ्लाईटने मुंबईत येऊन चोरी करणाऱ्या बंगळुरुच्या ऑर्केस्ट्रा सिंगरला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

  फ्लाईटने मुंबईत येऊन चोरी करणाऱ्या बंगळुरुच्या ऑर्केस्ट्रा सिंगरला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

  मुंबई पोलिसांनी बंगळुरु येथून एका महिला ऑर्केस्ट्रा सिंगरला अटक केली आहे. सकाळी मुंबईत येऊन चोरी करुन बंगळुरुला परतणाऱ्या या महिलेचा शोध मुंबई पोलीस गेल्या वर्षभरापासून घेत होते.

  मुंबई : मुंबई क्राईम ब्रांचने बुधावारी बंगळुरुतील एका ऑर्केस्ट्रा सिंगरला अटक केली आहे. या ऑर्केस्ट्रा सिंगरवर चोरी करण्याचा आरोप आहे. ही सिंगर सकाळी मुंबईत बंगळुरुवरुन फ्लाईटने येत होती, आणि संध्याकाळी चोरी करुन पुन्हा फ्लाईटने बंगळुरुला परत जात होती. या महिलेने जवळपास एक दशकापेक्षा जास्त काळ देशातील चार मोठ्या शहरांमध्ये चोऱ्या केल्या आहेत.

  महिलेचं नाव अर्चना बरुआ उर्फ मुनमुन असल्याचं सांगण्यात येत आहे. 46 वर्षीय मुनमुन आपल्या मुलीसह बंगळुरुमध्ये राहते आणि जवळपास 10 वर्षांपासून भारतातील 4 मोठ्या शहरांतील मोठ्या शोरुममध्ये चोरी करते. एवढ्या वर्षांमध्ये या महिलेने अनेक चोऱ्या केल्या आहेत. परंतु, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने तीन चोऱ्या मुंबईत, पाच चोऱ्या बंगळुरुमध्ये, दोन चोऱ्या हैदराबाद आणि एक चोरी कोलकात्यामध्ये केली आहे.

  मुंबईत लोअर परेल येथील फिनिक्स मॉलमधील झारा शोरुममध्ये या महिलेने जवळपास 15 लाखांची चोरी केली. तर त्याच मॉलमध्ये 2018मध्ये 4.5 लाखांची चोरी केली होती. तर 2018 मध्ये दादर येथील एका मॉलमध्ये या महिलेने जवळपास 4 लाख रुपयांच्या किमतीच्या वस्तु चोरी केल्या होत्या. दरम्यान, लहान वयातचं मुनमुनने लग्न केलं होतं. तसेच तिच्या गोड आवाजामुळे गाणं गाऊन ती पैसेही कमवत होती.

  मुनमुव 2013 मध्ये आपल्या पतीपासून वेगळी झाली आणि त्यानंतर तिला पैशांची चणचण भासू लागली. त्यामुळे उपजिविकेसाठी तिने चोरीलाच आपला व्यवसाय बनवलं. मुंबई पोलीस गेल्या एका वर्षापासून मुनमुनच्या शोधात होते. काही दिवसांपूर्वी मिळालेल्या माहितीचा मागोवा घेत मुंबई क्राईम ब्रांचच्या पथक बंगळुरुसाठी रवाना झालं आणि मुनमुनला ताब्यात घेतलं.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img