More
    HomeNationalबीई-बीटेकसह अनेक UG-PG अभ्यासक्रमांच्या प्रवेशअर्जांना मुदतवाढ

    बीई-बीटेकसह अनेक UG-PG अभ्यासक्रमांच्या प्रवेशअर्जांना मुदतवाढ

    सीटीई कक्षाने अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे…

    राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) ने अनेक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी कॅप राउंड अंतर्गत अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. यासंदर्भात सीईटी सेलने एक परिपत्रक जारी करून अभ्यासक्रमनिहाय नव्या तारखांचे वेळापत्रक जारी केले आहे.

    BE/B.Tech, B.Parmacy/Pharm. D, B.Arch, B. HMCT, DSE, DSP या यूजी कोर्सेसच्या तर MBA/MMS, ME?M.Tech, MCA, M.Pharmacy/Pharm.D, M.Arch या पीजी कोर्सेसच्या कॅप राऊंडअंतर्गत ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.

    अभ्यासक्रमनिहाय नोंदणीसाठी मुदतवाढ मिळालेल्या नव्या तारखा पुढीलप्रमाणे –

    पदवीपूर्व अभ्यासक्रम – नोंदणी करण्यासाठी नवी मुदत
    बीई, बीटेक – २२ डिसेंबर २०२०
    बी.फार्म – २१ डिसेंबर २०२०
    बी. आर्क. – २० डिसेंबर २०२०
    बी. एचएमसीटी – २३ डिसेंबर २०२०
    डीएसई – २१ डिसेंबर २०२०
    डीएसपी – २१ डिसेंबर २०२०

    पदव्युत्तर अभ्यासक्रम – नोंदणी करण्यासाठी नवी मुदत

    एमबीए / एमएमएस – २० डिसेंबर २०२०
    एमई / एम. टेक – २४ डिसेंबर २०२०
    एमसीए – २३ डिसेंबर २०२०
    एम. फार्मसी / फार्म. डी. – २३ डिसेंबर २०२०
    एम. आर्क. – २३ डिसेंबर २०२०

    नव्या राउंडचे विस्तृत वेळापत्रक येत्या दोन-तीन दिवसांत सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात येईल, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img