More
    HomePoliticsबीएचआर बँक घोटाळ्यात बड्या नेत्यांची नावे, यादी तयार, दोन दिवसांत गुन्हा दाखल...

    बीएचआर बँक घोटाळ्यात बड्या नेत्यांची नावे, यादी तयार, दोन दिवसांत गुन्हा दाखल होणार; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

    जळगाव: भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटी रूपयांच्या घोटाळ्यांवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या घोटाळ्यात राज्यातील काही बड्या नेत्यांची नावं आहेत. त्यांची यादीच तयार केली आहे, असा गौप्यस्फोट करतानाच ईडीने कारवाई करावी असंच हे प्रकरण असून येत्या दोन दिवसात या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. (big name in BHR scam; fir will file within two days says Eknath khadse)

    राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताई नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन बीएचआर घोटाळ्याप्रकरणी मोठा दावा केला. यावेळी खडसे यांनी भाजपचं थेट नाव घेतलं नाही, मात्र त्यांचा संपूर्ण रोख भाजप नेत्यांकडे होता. त्यामुळे या घोटाळ्यातील भाजपमधील हा बडा नेता कोण? अशी चर्चा रंगली आहे. बीएचआर घोटाळा प्रकरण खूप मोठं आहे. हे पहिलंच प्रकरण मी बाहेर काढलं आहे. ईडीने कारवाई करावी एवढं मोठं हे प्रकरण असून दोन दिवसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असं सांगतानाच या घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचं किंवा कार्यकर्त्याचं नाव नाही. शिवाय भाजप सोडून माझ्या सोबत आलेल्यांचंही नाव नाही. यात काही मोठ्या नेत्यांची नावं आहेत. त्यांची यादीच तयार केली आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

    Read more –

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img