बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्यमहामार्गावरील बीबी गावाजवळ रात्री अकराच्या सुमारास भरधाव ट्रेलरने दुचाकीस्वार पती-पत्नीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मेहकर-सिंदखेडराजा राज्यमहामार्गावर बीबीवरुन पती-पत्नी रात्री जात असताना पाठीमागून भरघाव येणाऱ्या ट्रेलरने जबर धडक दिली. पती आणि पत्नी ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रेलर चालकाने तिथून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच बीबी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बीबी सामान्य रुग्णालयात दाखल केले.
Read more –