More
  HomeMaharashtraMumbai Cityबृहन्‍मुंबई मनपा क्षेत्रातील परिसरातील 50 लाख लोकांची तपासणी होणार

  बृहन्‍मुंबई मनपा क्षेत्रातील परिसरातील 50 लाख लोकांची तपासणी होणार

  महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभागाचे पथक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार 50 Lakh People In The Area Of Greater Mumbai Municipal Corporation Will Be Investigated)

  मुंबईः बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात क्षयरोग आणि कुष्‍ठरोग नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी आपल्‍या बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्‍य विभाग सातत्‍याने प्रयत्‍नशील आहे. याच प्रयत्‍नांचा भाग म्‍हणून येत्‍या 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2020 दरम्‍यान राबविण्‍यात येणा-या एका संयुक्‍त मोहिमेदरम्‍यान महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभागाचे पथक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत. हे सर्वेक्षण सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 या कालावधी दरम्‍यान केले जाणार आहे. तरी मुंबईतील नागरिकांनी महापालिकेच्‍या क्षयरोग व कुष्‍ठरोग तपासणी पथकास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्‍या कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे. (50 Lakh People In The Area Of Greater Mumbai Municipal Corporation Will Be Investigated)

  या अभियानांतर्गत क्षयरोगाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवलेल्‍या परिसरामधील साधारपणे 12 लाख 12 हजार 693 घरातील 50 लाख 9 हजार 277 व्‍यक्‍तींची क्षयरोग व कुष्‍ठरोग तपासणी करण्‍यात येणार आहेत. या तपासणी अभियानासाठी महापालिकेची 3 हजार 451 पथके कार्यरत असणार आहेत. या पथकांद्वारे त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील घरांना प्राधान्‍याने सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 या दरम्‍यान भेटी देऊन क्षयरोग व कुष्‍ठरोग विषयक  वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तथापि घरातील व्‍यक्‍ती कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी बाहेर असल्‍यास सदर पथक दिवसातील इतर वेळीदेखील भेट देऊन तपासणी करु शकेल. (50 Lakh People In The Area Of Greater Mumbai Municipal Corporation Will Be Investigated)या अभियानांतर्गत क्षयरोगाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवलेल्‍या परिसरामधील साधारपणे 12 लाख 12 हजार 693 घरातील 50 लाख 9 हजार 277 व्‍यक्‍तींची क्षयरोग व कुष्‍ठरोग तपासणी करण्‍यात येणार आहेत. या तपासणी अभियानासाठी महापालिकेची 3 हजार 451 पथके कार्यरत असणार आहेत. या पथकांद्वारे त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील घरांना प्राधान्‍याने सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 या दरम्‍यान भेटी देऊन क्षयरोग व कुष्‍ठरोग विषयक  वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तथापि घरातील व्‍यक्‍ती कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी बाहेर असल्‍यास सदर पथक दिवसातील इतर वेळीदेखील भेट देऊन तपासणी करु शकेल. (50 Lakh People In The Area Of Greater Mumbai Municipal Corporation Will Be Investigated)

  वरीलनुसार प्राथमिक तपासणी दरम्‍यान आढळणा-या क्षयरोग संशयित रुग्‍णांच्‍या बेडख्‍याची तपासणी करण्‍यासह क्ष-किरण चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी संशयित रुग्‍णांच्‍या परिसर जवळ असणा-या बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या अगर सरकारी प्रयोग शाळेत मोफत केली जाणार आहे. तसेच क्ष-किरण चाचणी देखील निर्धारित करण्‍यात आलेल्‍या खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये मोफत केली जाणार आहे. निर्धारित करण्‍यात आलेल्‍या खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये मोफत तपासणी करता यावी यासाठी संशयित रुग्‍णाला विशेष ‘व्‍हाऊचर’ देण्‍यात येणार आहेत. ज्‍यामुळे संशयित रुग्‍णाला खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये जाऊन मोफत चाचणी करवून घेता येणार आहे. यानुसार अभियनादरम्‍यान चाचणी केल्‍यानंतर क्षयरोगाची बाधा आढळून आलेल्‍या रुग्णांना मोफत औषधोपचार दिले जाणार आहेत.

  याच अभियनादरम्‍यान आढळून येणा-या कुष्‍ठरोग संशयितांना नजिकच्‍या दवाखान्‍यात किंवा रुग्‍णालयात संदर्भित करण्‍यात येणार आहे. कुष्‍ठरोग संशयितांची तपासणी ही वैद्यकीय अधिका-यांमार्फत करण्‍यात येणार आहे. क्षयरोगविषयक लक्षणांबाबत अधिक माहिती देताना महापालिकेच्‍या कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. गोमारे यांनी सांगितले की, 14 दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असणे, दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ ताप असणे किंवा सायंकाळच्‍या वेळेस ताप येणे, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकीमधून रक्‍त पडणे, छातीत दुखणे, मानेवर सूज असणे, ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळून आल्‍यास संबंधितानी तातडीने महानगरपालिकेच्‍या किंवा सरकारी रुग्‍णालयातून क्षयरोगाची चाचणी करवून घ्‍यावी. ही चाचणी पूर्णपणे मोफत आहे.

  तसेच ज्‍यांच्‍या कुटुंबामध्‍ये एखाद्यास क्षयरोगाची बाधा झाल्‍याचा इतिहास आहे किंवा ज्‍यांना यापूर्वी क्षयरोगाची बाधा झाली होती, अशा व्‍यक्‍तींनी क्षयरोगाच्‍या लक्षणांबाबत अधिक जागरुक असणे अत्‍यंत गरजेचे आहे. ज्‍यांना क्षयरोगाची बाधा झालेली आहे, त्‍यांनी औषधोपचाराचा कोर्स नियमितपणे व योग्‍य प्रकारे पूर्ण केल्‍यास क्षयरोग बरा होऊ शकतो. मात्र यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्‍या पद्धतीनेच औषधोपचार घेणे, अत्‍यंत आवश्‍यक आहे.

  read more

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img