More
    HomeMaharashtraMumbai Cityब्रेन स्ट्रोकमुळे राहुल रॉय यांच्या शरीराच्या डाव्या बाजूवर परिणाम; औषधांना सकारात्मक प्रतिसाद...

    ब्रेन स्ट्रोकमुळे राहुल रॉय यांच्या शरीराच्या डाव्या बाजूवर परिणाम; औषधांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची डॉक्टरांची माहिती

    अभिनेते राहुल रॉय यांना ‘LAC – लिव्ह द बॅटल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ब्रेन स्ट्रोक आला. सध्या त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं आहे.

    मुंबई : 1990 मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर सिनेमा ‘आशिकी’मधून एका रात्रीत स्टार बनलेले अभिनेते राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यामुळे त्यांना अफेजया नावाचा आजार झाला आहे. या आजारामुळे ते कोणतंही वाक्यं व्यवस्थित बोलू शकतं नाहीत. रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांची शस्त्रक्रिया करण्यावर विचार करत आहे. परंतु, शस्त्रक्रिया करणं त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक मानलं जातं आहे. त्यामुळे अद्याप त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

    ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नानावटी रुग्णालयातील डॉक्टरांचं म्हणणं आहे की, राहुल रॉय यांच्यावर उपचार सुरु असून ते औषधांना प्रतिसाद देत आहेत. तसेच त्यांचा वायटल पॅरामीटर सामान्य होत आहे. परंतु, यामुळे राहुल यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूवर परिणाम झाला आहे. तसेच एक हातही अशक्त झाला आहे. त्यांची रिकव्हरी फार सावकाश होत आहे. त्यांना नंतर फिजिओथेरपीच्या काही सेशन्सची गरज पडणार आहे.

    औषधांचा होतोय परिणाम

    दरम्यान, राहुल रॉय यांना कारगिलमध्ये ‘LAC – लिव्ह द बॅटल’च्या चित्रीकरणादरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. राहुल यांची बहीण प्रियांका आणि तिचे पती रोमिर सेन त्यांची काळजी घेत आहेत. रोमिर सेन यांनी राहुल यांच्या तब्बेतीबाबत सांगितलं की, “आम्ही राहुल यांच्या सोबत आहोत आणि डॉक्टरांनी जे ट्रिटमेंट करत आहेत, त्यांना ते सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. ते लवकरच ठीक होतील. परंतु त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”

    Read more –

    https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/actor-rahul-roy-health-update-actor-right-side-affected-romeer-sen-says-treatment-in-good-direction-833834

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img