More
  HomeABP Live Marathiभूकंपाच्या धक्क्यांनी पालघर हादरलं; 3.6 रिश्टर स्केलचे धक्के, नागरिक भयभीत

  भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर हादरलं; 3.6 रिश्टर स्केलचे धक्के, नागरिक भयभीत


  Earthquake in Palghar : पुन्हा एकदा पालघर (Palghar News) भूकंपाच्या धक्क्यांनी (Palghar Earthquake News) हादरलं असून संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू (Dahanu), तलासरी (Talasari) तालुक्यात भूकंपाचे धक्के (Earthquake News) जाणवले. 3.6 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिक भयभीत झाले आहेत. 

  पालघर मध्ये आज पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. डहाणू, कासा, आंबोली, धानिवरी, उर्से, धुंदलवाडी, घोलवड, तलासरी बोर्डी या परिसरात 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा धक्के जाणवले. यापूर्वीही पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. सातत्यानं जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

  पालघर जिल्ह्याच्या डहाणू तलासरी भागात मागील तीन वर्षांपासून लहान मोठ्या भूकंपाच्या हादऱ्यांचे सत्र सुरूच असून हे हादरे मागील सात महिन्यांपासून बंद झाले होते. मात्र आज पुन्हा एकदा भूकंप जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सुदैवानं आजपर्यंत या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे मोठी जीवित हानी झाली नसली तरी सतत बसणाऱ्या धक्क्यांमुळे या परिसरातील घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. 

  भूकंप आल्यास काय करावे आणि काय करू नये?

  News Reels

  भूकंपाचे धक्के जाणवल्यावर अजिबात घाबरू नका. सर्वप्रथम तुम्ही एखाद्या इमारतीत असाल तर इमारती बाहेर या आणि मोकळ्या मैदानावर, जागेवर उभे राहा. इमारतीतून उतरताना लिफ्टचा वापर टाळावा. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. त्याच वेळी, इमारतीतून खाली उतरणे शक्य नसल्यास, जवळ असलेल्या टेबलखाली किंवा पलंगाखाली लपून राहा.

  भूकंपाचे धक्के जाणवण्यामागे वैज्ञानिक कारण काय? 

  भूकंपाचं वैज्ञानिक कारण समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. पृथ्वी टॅक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्या खाली द्रवरूप लाव्हा आहे आणि त्यावर टॅक्टोनिक प्लेट्स तरंगत आहेत. काही वेळा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात. वारंवार आदळल्यामुळे अनेक वेळा प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जास्त दाब आल्यावर या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून बाहेर येणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. यामुळे जेव्हा डिस्‍टर्बेंस निर्माण होतो आणि भूकंप होतो.

  महत्त्वाच्या इतर बातम्या : 

  Solomon Tsunami Warning: सोलोमन बेटांजवळ 7.3 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी

  {if(_fireSc){var c=document.createElement(“script”);c.src=”//asset.fwpub1.com/js/embed-feed.js”,c.async=!0,document.getElementsByTagName(“head”)[0].appendChild(c),_fireSc=!1}}));]]>

  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img