More
    HomeMaharashtraPune'मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या,...

    ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो’, उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

    पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो,’ अशा शब्दात उदयनराजे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं. ‘देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या सरकारच्या काळात करुन दाखवलं होतं, पण आज त्यांना नावं ठेवली जातात. आज तुम्ही सत्तेत आहात तर करुन दाखवा,’ असं थेट आव्हानच उदयनराजे यांनी राज्य सरकारला दिलंय. (MP Udayanraje Bhosle criticize state government on Maratha reservation)

    मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. त्यानंतर अद्याप राज्य सरकारनं कुठलीही पाऊल उचललं नसल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला आहे. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, सर्वधर्मसमभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचं कामच आजपर्यंत झाल्याची टीकाही उदयनराजे यांनी केलीय.

    आज मराठा म्हणून बोलत नाही- उदयनराजे

    आपण मराठा समाजात जन्माला आलो असलो तरी आज मराठा म्हणून बोलत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊन, प्रत्येक समाजातील व्यक्तीला न्याय मिळायला हवा, या भूमिकेतून मुद्दे मांडत असल्याचं उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यातील सत्ताधाऱ्यांनीच मार्गी लावला पाहिजे, कारण त्यांनीच हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवल्याचा घणाघातही उदयनराजेंनी यावेळी केला.

    राज्यात जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप करतानाच अन्य समाजाचे अधिकार, त्यांचं आरक्षण अबाधित ठेवा, पण मराठा समाजावर अन्याय का? असा प्रश्नही उदयनराजे यांनी विचारला आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेत जेवढे मराठा आणि अन्य समाजाचे खासदार-आमदार आहेत, त्या सर्वांची मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी असल्याचं आवाहनही उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं आहे.

    read more-

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img