More
    HomeNationalMaharashtra'महाराष्ट्रातील चित्र बदलतेय, हा एकजुटीचा विजय', शरद पवारांची प्रतिक्रिया

    ‘महाराष्ट्रातील चित्र बदलतेय, हा एकजुटीचा विजय’, शरद पवारांची प्रतिक्रिया

    विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे.

    दोन जागांवर विजय तसेच दोन जागांवर आघाडी घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय असल्याचं म्हटलं आहे

    पुणे : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. दोन जागांवर विजय तसेच दोन जागांवर आघाडी घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय असल्याचं म्हटलं आहे.
    पवार म्हणाले की, गेल्या वर्षभर काम करून दाखवलं आहे. यामध्ये मुख्यतः नागपूरची जागा कधीच मिळाली नव्हती तो गड कॉंग्रेसने जिंकला. हा महाराष्ट्रातील निकाल महाविकास आघाडीचा विजय आहे. महाविकास आघाडी सरकारने एकत्र काम केलं त्याचं यश आहे. पुणे मतदारसंघातही आम्हाला यश मिळवता आलं नव्हतं. मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे. आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यापेक्षा वेगळा निकाल आलाय. महाराष्ट्रातील चित्र बदलते आहे. सर्व उमेदवाराचे अभिनंदन करतो जनतेच आभार अशा शब्दात त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे. धुळे, नंदुरबार विधानपरिषदेचा निकाल हा अजिबात आश्चर्यकारक नाही. निर्वाचित होते तेच त्यांच्या हाती मोठा वर्ग पूर्वी होता. हा त्यांचा तो खरा विजय नाही, असं शरद पवार म्हणाले.

    शरद पवार पुढं म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्षांचा विनोदी वक्तव्य करण्याचा लौकिक आहे. मागच्या वेळेस विधानपरिषदेला चंद्रकांत दादा कसे निवडून आले. गेल्यावेळी आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते, त्यामुळे ते निवडून आले. त्यामुळेच पुणे शहरातील त्यांच्या सोयीचा मतदारसंघ निवडला. त्यांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ निवडला नसता, असं ते म्हणाले.

    हा विजय सरकारवरील विश्वासाचं प्रतिक, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड हे 49 हजार मताधिक्क्यानं, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतिश चव्हाण हे 58 हजार मताधिक्क्यानं विजयी झाल्याबद्दल अजित पवार यांनी दोन्ही उमेदवारांचं अभिनंदन केलं. महाविकास आघाडीचे अन्य उमेदवारही आघाडीवर असून त्यांचा विजयही लवकरच जाहीर होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतिक असल्याचे सांगून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे, राज्यातील जनतेचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

    शिक्षक, पदवीधरमध्ये महाविकास आघाडीची सरशी
    विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे. नागपूर पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img