More
  HomeCoronaमुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता, गर्दीशी संपर्क येणारे 150 जण कोरोना...

  मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता, गर्दीशी संपर्क येणारे 150 जण कोरोना पॉझिटिव्ह

  मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता आहे. कारण मास टेस्टिंग अंतर्गत गर्दीशी संपर्क आलेल्या 150 विक्रेते, व्यावसायिक, बस चालक-वाहकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

  मुंबई : मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महापालिकेने केलेल्या मास टेस्टिंग अंतर्गत गर्दीशी संपर्क आलेल्या 150 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये विक्रेते, व्यावसायिक, बस चालक-वाहक यांचा समावेश आहे.

  बसमधून प्रवासी भरभरुन जात होते. शिवाय दिवाळीनंतर बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने दिवाळीनंतर म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून मास टेस्टिंग मोहीम हाती घेतली होती. ज्या लोकांचा गर्दीशी सातत्याने संपर्क येतो, त्यांची टेस्टिंग या मोहिमेअंतर्गत करण्यात आली. यामध्ये दुकानदार, फेरीवाले, वेगवेगळ्या ठिकाणचे व्यावसायिक, बाजारातील विक्रेते यांची कोरोना चाचणी करण्यात आली.

  जवळपास एक लाखांपेक्षा जास्त जणांची चाचणी या मोहिमेअंतर्गत केली. त्यामध्ये आतापर्यंत 150 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. टेस्टिंगच्या तुलनेत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या कमी असली तरी या 150 जणांचा संपर्क एक, दोन पेक्षा जास्त लोकांशी सातत्याने आलेला आहे, म्हणजेच गर्दीशी आलेला आहे. त्यामुळे चिंता वाढू शकते.

  दरम्यान मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून योग्य वेळी पावलं उचलत या 150 जणांना आयसोलेट केलं आहे. त्यांना उपचारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अॅडमिटही केलं आहे. सोबतच या 150 जणांच्या कुटुंबाचीही चाचणी करण्यात आली आहे.

  read more-

  https://marathi.abplive.com/news/mumbai/the-possibility-of-super-spreader-in-mumbai-is-likely-to-increase-150-tested-positive-for-coronavirus-833569

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img