मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरानिमित्त दादर येथील वीर सावरकर सभागृहात शिवसैनिकांना संबोधित केले. दसरा निमित्त आयोजित दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांनी सर्व मुद्द्याला हात घालत अगदी तडाखेबंद भाषण केले आहेत. त्यांनी केलेल्या भाषणात सद्यस्थिती सुरू असलेल्या सगळ्याच मुद्यांना हात घातला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भाषणात भारतीय जनता पार्टीवर प्रखर हल्ला चढवून शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. शिवसेनेच्या रक्तात विचारातच हिंदुत्व असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. यासोबतच कंगना राणावत, सुशांत सिंग राजपूत, बिहार निवडणूक, देशाचे संरक्षण व सद्यस्थितीत सुरू असलेल्या ज्वलंत मुद्द्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात घातला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेक व्यक्तीची नावे न घेता त्यांच्यावर जबरदस्त निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोशियारी, राणे कुटुंब, अभिनेत्री कंगना, राणावत, जीएसटी या मुद्द्यांवर त्यांनी आपल्या ठाकरे शैलीत प्रकाश टाकला आहे
Create an account
Welcome! Register for an account
A password will be e-mailed to you.
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.