More
  HomeNationalMaharashtraम्हणून उद्धव ठाकरेंनी माझी नियुक्ती केली: संजय राऊत

  म्हणून उद्धव ठाकरेंनी माझी नियुक्ती केली: संजय राऊत

  मुंबईः संजय राऊतांचं नाव घेतलं की कानाला त्रास होतो, अशी टीका करणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

  राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजप नेत्यांकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे. तसंच, ठाकरे सरकार हे पूर्णपणे गोंधळलेले आणि अपयशी सरकार असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. यावर बोलताना संजय राऊत यांनीही पलटवार केला आहे.

  ‘कानाला, डोळ्याला आणि हृदयाला त्रास झालाच पाहिजे. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नेमणूक केली आहे,’ असा खोचक टोला त्यांनी हाणला आहे.

  उर्मिला मातोंडकर १ डिसेंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्या भेट घेणार असल्याचीही चर्चा आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ‘उर्मिला या शिवसेनेतच आहेत. त्या बहुतेक उद्या पक्ष प्रवेश करतील, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळं महिला आघाडी मजबूत होईल,’ असं राऊत म्हणाले आहेत.

  केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाबाबतही राऊतांनी केंद्राविरोधात टीका केली आहे. ‘पंजाब, हरियाणातील शेतकरी महाराष्ट्राप्रमाणे आहेत. हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाण या राज्यांनी प्रयत्न केला. जो शेतकरी तुमचा अन्नदाता आहे त्याला तुम्ही दहशतवादी म्हणता. शेतकरी काय दहशतवादी आहेत का?,’ असा सवाल राऊतांना केला आहे.

  read more –

  https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/sanjay-raut-reaction-on-chandrkant-patil-statement/articleshow/79487980.cms

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img