मुंबई : म्हाडा वसाहतीच्या (MHADA) 56 गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून वाढीव सेवा शुल्कावर सूट देण्यासाठी शासन सकारात्मक असून, यासाठी गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार तातडीने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. (Big Discount From MHADA; These Homes will Benefit)
आज वर्षा येथील समिती कक्षात म्हाडा वसाहतीच्या गृहनिर्माण संस्थांना सेवा शुल्कावर सूट देण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर, आमदार मंगेश कुडाळकर, मुख्य सचिव संजीव कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
निवासी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनीच्या थकीत सेवाशुल्कात सवलत देण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार अभय योजना तयार करून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा. तसेच भोगवटादार वर्ग -2 जमिनीचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्याची स्थगिती उठवून कार्यवाही सुरू करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आलेत. बैठकीत स्वदेशी मिल कंपाऊंडमधील कामगारांच्या घराबाबत व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचे तसेच नेहरूनगर म्हाडा वसाहतीतील पोलिसांच्या सेवा निवासस्थानाच्या अनुषंगाने चर्चा झाली.
Read more –