मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरील अँजिओप्लास्टी यशस्वी झाली असून त्यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. “माझी तब्येत ठणठणीत आहे. चार दिवस उपचार केले. हृदयाचा त्रास आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने, लिलावती रुग्णालयातील डॉक्टर यांच्यामुळे मी आता बरा आहे. दोन दिवस विश्रांती घेऊन कामाला लागेन, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली. सोबतच राजकीय पथ्ये थोडीफार पाळू, असंही ते म्हणाले.
Read more –