More
    HomeNationalMumbaiरेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्याचं प्रसंगावधान, आजी-नातवाला लोकलखाली जाण्यापासून वाचवलं

    रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्याचं प्रसंगावधान, आजी-नातवाला लोकलखाली जाण्यापासून वाचवलं

    मुंबई : मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील करीरोड रेल्वे स्थानकात एक वयस्कर महिला आणि तिच्या चार वर्षांच्या नातवाला रेल्वेखाली जाण्यापासून रेल्वेच्या एक कर्मचारी आणि लोहमार्ग पोलिसाने वाचवले. ही सर्व थरारक घटना या रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    करीरोड स्थानकात फलाट क्रमांक दोनवर 65 वर्षीय सुजाता चव्हाण त्यांच्या चार वर्षांच्या नातवाला घेऊन लोकलमधून उतरत होत्या. त्यांचा नातू लोकलमधून फलाटावर उतरला. मात्र सुजाता चव्हाण उतरत असतानाच लोकल ट्रेन सुरु झाली. यामुळे महिला आणि तिचा नातू लोकलच्या दारातच पडले.

    दोघेही फलाटावरुन लोकलखाली जाणार एवढ्यात त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले लोहमार्ग पोलीस कैलास पठाडे आणि फलाटावरुन चालत जात असलेले रेल्वेचे बुकिंग क्लर्क उमानाथ मिश्रा यांनी चपळाई आणि प्रसंगावधान दाखवत त्यांच्याकडे धाव घेऊन त्यांना लोकलखाली जाण्यापासून वाचवले. हा सर्व थरार फलाटवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

    आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांनी दोन वर्षात 34 प्रवाशांचे प्राण वाचवले
    मागील दोन वर्षांत रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 34 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. 2019 मध्ये 21 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आलं. यामध्ये दादर स्थानकावर सात तर भायखळा, कुर्ला, कल्याण आणि कर्जत स्थानकांवर प्रत्येकी दोन जणांचे प्राण वाचवले आहेत. तसंच 2020 मध्ये पोलिसांनी 13 प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. यापैकी सहा घटना या कल्याण रेल्वे स्थानकात घडल्या आहेत. लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या प्रवासादरम्यान या घटना घडल्याची माहितीही रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img