भिवंडी : लाखोंच्या घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात सहभाग असलेल्या ‘गब्बर’ नावाचा सराईत घरफोड्याने दोन साथीदारांसह भिवंडी तालुक्यातील भूमी इंडस्ट्रियल मधील कृष्णा फॅब्रीक्सच्या गोदामातून 7 लाख 68 हजार रुपयांचे सोफ्याकरिता लागणारे कापडाचे वेगवेगळ्या कंपनीचे रोल एका टेम्पोत भरून लंपास केले होते. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी गब्बर उर्फ अजय हरिजन, मोहम्मद इरफान जैनुलआबिदिन शेख , संतोष खरात असे लाखोंच्या घरफोडी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या आरोपी त्रिकूटाकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमालासह टेम्पो जप्त करण्यात आला आहे. तर अनेक लाखोंच्या घरफोड्या करूनही ‘गब्बर’ भिकारीच राहिल्याने तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Read more –