More
  HomeElectionशिक्षक मतदार संघात मद्यविक्री बंद

  शिक्षक मतदार संघात मद्यविक्री बंद

  अकोला,दि. 25 (जिमाका)- अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकचा कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यात शिक्षक मतदार संघात मंगळवार दि. 1 डिसेंबर रोजी मतदान व गुरुवार दि. 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्याकरीता लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 35(सी) मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र मद्य निषेद अधिनियम अंतर्गत असलेले महाराष्ट्र  देशीदारु नियम 1973 चे नियम 20 व 26(क)(2) व विदेश मद्य नियम 1969 चे नियम 9(ए) मधील (सी)(2) च्या तरतुदीनुसार संपुर्ण जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या एफएल-1, एफएल-2, सिएल/एफएल/टिओडी 3, एफएल,बिआर-2, एफ/एल-3,4(क्लब),सीएल-2, सीएल-3  अनुज्ञप्ती मतदान प्रक्रीये करीता रविवार दि. 29 नोव्हेंबरच्या सायंकाळी 5.00 वा. पासून ते मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020 च्या सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत, तर मतमोजणीच्या दिवशी गुरुवार दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणीचा निकाल लागेपर्यंत किवा सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत जी नंतर येईल तो पर्यंत बंद ठेवण्यात यावे.

  अनुज्ञप्त्या बंदच्या कालावधीत सर्व मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांनी  मद्यविक्रीसाठी उघडी ठेवू नये, असे आढळल्यास संबधीत अनुज्ञप्ती व अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कडक कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.   

  Read more-

  https://dio-akola.blogspot.com/2020/11/blog-post_96.html

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img