More
  HomeNationalDelhiशेतकरी आंदोलनाचा 20वा दिवस, आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता, आज शेतकरी नेत्यांची...

  शेतकरी आंदोलनाचा 20वा दिवस, आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता, आज शेतकरी नेत्यांची महत्वाची बैठक

  नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 20 वा दिवस आहे. सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आज शेतकरी नेत्यांच्या एका महत्वाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. अजूनही शेतकरी आणि सरकारमध्ये कृषी कायद्यातील मुद्द्यांवरुन मतभेद सुरुच आहेत. आज 20 व्या दिवशी शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. आजच्या बैठकीनंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. शेतकरी नेते आंदोलनासोबत सरकारला चर्चा करण्यासाठी देखील आवाहन करत आहेत. केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, शेतकऱ्यांना चर्चेचा पर्याय अजूनही खुला आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, शेतकरी जर काही प्रस्ताव देत असतील तर आम्ही तयार आहोत. मात्र दुसरीकडे शेतकरी कृषी कायदे परत घेण्याच्या मागणीवर अडून आहेत.

  Read more-

  https://marathi.abplive.com/news/india/farmer-protest-20-days-news-latest-update-farmer-bill-law-delhi-borders-update-838631

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img