More
  HomeUncategorizedसंजय राऊत यांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा, नितेश राणेंचा खळबळजनक दावा

  संजय राऊत यांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा, नितेश राणेंचा खळबळजनक दावा

  संजय राऊत यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीची नोटीस आल्याचा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे. (Nitesh Rane Sanjay Raut)

  संजय राऊत यांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा, नितेश राणेंचा खळबळजनक दावा

  हिंगोली : ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता खासदार संजय राऊत यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीच्या नोटिसा आल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. “प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असताना याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची माझी माहिती आहे,” असं नितेश राणे म्हणाले आहेत. ते हिंगोलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Nitesh Rane claims that Sanjay Raut relatives also received notice from the ED)

  महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. ठाकरेंची ही मुलाखत चांगलीच वादळी ठरली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या या मुलाखतीवर घणाघाती टीका केली. याच मुलाखतीवर बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांचा समाचार घेतला. “प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई सुरू असताना याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची माझी माहिती आहे.” असं नितेश राणे म्हणाले.

  नातेवाईकांना नोटिसा मिळाल्यामुळेच फडफड

  प्रताप सरनाईक यांना ईडीकडून नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी सरनाईक यांची पाठराखण करत ईडीच्या कारवाईवर वेळोवेळी टीका केली आहे. यावर बोलताना, “संजय राऊतांच्या नातेवाईकांना नोटिसा मिळाल्यामुळेच ते जास्त फडफड करत आहेत,” असं नितेश राणे म्हणाले. तसेच, ईडीच्या कारवाईमुळेच राऊत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नव्हते ना?, अशीही मला शंका आहे, असेही नितेश राणे म्हणाले. (Nitesh Rane claims that Sanjay Raut relatives also received notice from the ED)

  दरम्यान, संजय राऊत यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधातील कारवाईवरुन भाजपला लक्ष्य केलं. “चौकशीला कोणीही घाबरत नाही, घाबरण्याचं कारणच नाही. आता तुम्ही चौकशांना घाबरायला पाहिजे. महाराष्ट्रातसुद्धा सत्ता आहे, हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, हे विसरु नका. मला अनेकांनी विचारलं की तुम्हाला ईडीची नोटीस आली का? सध्या आली नाही, पण आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवारांना किंवा अन्य कोणालाही येऊ शकते. शरद पवारांना तर येऊनही गेली. मला असं कळलं की जुनी थडगी उकरण्याचा प्रयत्न, वीस-वीस वर्षांपूर्वीचं उत्खनन सध्या सुरु आहे. ईडीवाले मोहेंजोदडो, हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. काढू द्या, आम्हीही तयार आहोत,” असं संजय राऊत 25 नोव्हेंबर रोजी म्हणाले होते. तसेच, “ईडीनं आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडली आहे. आमच्या आमदार, खासदारांच्या घरासमोर ईडीनं तळ ठोकला तरी आम्ही घाबरणार नाही,” असा टोला त्यांनी भाजपला 24 नोव्हेंबरला लगावला होता

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img