More
    HomeCareerसंधी नोकरीच्या : क्रांती इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनमधील

    संधी नोकरीच्या : क्रांती इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनमधील

    संपूर्ण जग आता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील क्रांतीमुळे एकमेकांशी जोडले गेले आहे. जगातल्या कुठल्याही कोनाकोपऱ्यात एखादी घटना घडल्यास ती काही मिनिटांतच संपूर्ण जगात पसरविण्याची किमया इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून घडून आली आहे. ‘५ जी’ तंत्रज्ञानाचे पडघम जगभरात वाजत आहेत.

    संपूर्ण जग आता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील क्रांतीमुळे एकमेकांशी जोडले गेले आहे. जगातल्या कुठल्याही कोनाकोपऱ्यात एखादी घटना घडल्यास ती काही मिनिटांतच संपूर्ण जगात पसरविण्याची किमया इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून घडून आली आहे. ‘५ जी’ तंत्रज्ञानाचे पडघम जगभरात वाजत आहेत. केंद्र शासनातर्फे आयात केल्या जाणाऱ्या ३,००० इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे भारतातच उत्पादन करण्यासाठी बऱ्याचशा राज्यांत इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर्सची स्थापना करण्यात येत आहे. पुण्यातील तळेगावजवळ देखील महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर बनणार आहे.

    जगतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारताचा वाटा २०१२ मध्ये जवळपास १.५ टक्के होता, तर २०१९ पर्यंत हे प्रमाण साधारण ३.५ टक्क्यंपर्यंत पोचले. ‘असोचाम’ व ‘एनईसी’च्या अहवालानुसार भारतातील इलेक्ट्रॉनिक्सचे मार्केट २०२०च्या वर्षअखेरपर्यंत ४०० अब्ज डॉलरपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. आज मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर यांसारख्या डिजिटल उपकरणांचा वापर सर्व तांत्रिक गोष्टींमध्ये होत आहे, या सर्वांची जननी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन शाखा. याच शाखेमुळे या उपकरणांना लागणारे सर्व हार्डवेअर तयार होते. ‘मुर’च्या सिद्धांतानुसार मायक्रोचिपमधील ट्रान्झिस्टर्सची संख्या प्रत्येक दोन वर्षांत दुप्पट होत असते. म्हणजे, कॉम्प्युटरचा वेग प्रत्येक दोन वर्षांत जवळपास दुप्पट होत असतो. 

    इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमधील करिअर संधी
    कोअर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील संधी

    या प्रकारातील नोकऱ्यांमध्ये जॉब प्रोफाइल हे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राशी निगडित असून 

    • Robotics
    • Nano Technology
    • Digital Electronics 
    • Circuit Design 
    • VLSI, IOT  
    • Embedded 
    • Networking 
    • Signal Processing 
    • Power Electronics 
    • Control Systems 

    यांसारख्या तंत्रज्ञानातील संधीचा देखील यात समावेश होतो.

    कोअर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करणाऱ्या काही कंपन्या

    • Siemens
    • KPIT Technologies
    • LG
    • Samsung
    • Philips
    • Sony
    • Motorola
    • Hitachi
    • Whirlpool
    • Intel
    • Ericsson
    • Nokia
    • Bharti Airtel
    • ZTE
    • Vodafone
    • Reliance
    • Fujitsu

    आयटी क्षेत्रातील संधी
    इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन शाखेचे विद्यार्थी एकप्रकारे नशीबवान असतात. कारण, स्वतःच्या कोअर शाखेतील नोकऱ्यांबरोबरच त्यांना आयटी क्षेत्रातील कंपन्यांत देखील मोठ्या प्रमाणावर संधी असते. त्यासाठी सुरुवातीपासूनच C / C++ / Embedded C यांसारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजवर प्रभुत्व मिळवायला हवे. Wipro, Capgemini, Infosys, TCS, Accenture, Cognizant यांसारख्या IT क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपन्यांत देखील इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाते. 

    संशोधन क्षेत्रातील संधी
    ISRO, DRDO यांसारख्या संस्थांमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना संशोधनातील उत्तम संधी देखील मिळू शकतात. 

    शासकीय नोकऱ्यांच्या संधी
    GATEच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून विद्यार्थी नवरत्न, महारत्न यांसारख्या शासकीय कंपनीत नोकऱ्या मिळवू शकतात. BSNL, ONGC, NTPL, Power Grid, Bharat Petroleum यांसारख्या सरकारी कंपनीत संधी उपलब्ध असतात. MPSC, UPSC  यांसारख्या परीक्षा देऊनदेखील शासकीय यंत्रणेतील नोकऱ्या मिळविता येऊ शकतात. मात्र, त्यांचे प्रमाण खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या मानाने कमी असते. त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्रातील आर्मी, नेव्ही वा एअर फोर्समध्ये देखील काही संधी उपलब्ध असतात. 

    उच्च शिक्षणातील संधी
    भारतात तांत्रिक क्षेत्रातील  M.E / M.Tech ची पदवी व त्यांनतर Ph.D देखील करू शकतात. त्यासाठी GATE चा चांगला स्कोअर आवश्यक असतो. १० ते १२ हजार रुपये प्रतिमाह भत्तादेखील विद्यार्थ्यांना मिळू शकतो. विदेशात M.S. करायचे असल्यास GRE ची परीक्षा द्यावी लागते. मॅनेजमेंट क्षेत्रातील MBA भारतात करण्यासाठी CAT वा CET ची परीक्षा असते व विदेशातील MBA पदवीसाठी GMAT परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर PhD देखील करता येते. 

    व्यवसायातील संधी 
    इलेक्ट्रॉनिक्स वा इतर क्षेत्रांतील स्वतःचा व्यवसाय देखील विद्यार्थी सुरू करू शकतात.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img