More
  HomeMaharashtraSataraसत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडी एकत्र; उदयनराजेंची घणाघाती टीका

  सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडी एकत्र; उदयनराजेंची घणाघाती टीका

  सातारा: सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आले आहेत. स्वार्थ संपला की ते एकत्र राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. सातारा येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी आले असता उदयनराजेंनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. (udayanraje bhosale slams mahavikas aghadi over Legislative Council election)

  केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. केवळ सत्ता हस्तगत करणं हा त्यांचा एकत्र येण्यामागचा हेतू आहे. ज्यावेळेस वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात, त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरिता अमिष दाखवले जाते. मात्र ते कधीच एकत्र राहत नाहीत. त्यांचा उद्देश सार्थक झाला तर ते सर्व निघून जातात. याला फक्त भाजप अपवाद आहे. भाजप विचाराने एकत्र आहे. त्यांना कोणत्याही ताकदीचा वापर करावा लागत नाही. त्यांचे उद्दिष्टं निश्चित असून त्यामुळेच ते एकसंघ आहेत, असं उदयनराजे यांनी सांगितलं

  Read more –

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img