More
  HomePoliticsसोनिया गांधींचं उद्धव ठाकरेंना पत्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची उघड नाराजी?

  सोनिया गांधींचं उद्धव ठाकरेंना पत्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची उघड नाराजी?

  मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतंच एक वर्ष झालं. अस असलं तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. त्यात सोनिया गांधी यांचा आता लेटर बॉम्ब आला आहे.

  आतापर्यंत राज्य पातळीवर काँग्रेसची नाराजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून मांडली जात होती. पण यावेळी मात्र महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासाबद्दल मुद्दे उपस्थित केल्याचे सांगितले

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img