More
    HomePoliticsपश्चिम बंगालमध्ये भाजपकडे इनकमिंगला वेग, अमित शाह म्हणाले- निवडणुकीपर्यंत एकट्या पडणार दिदी

    पश्चिम बंगालमध्ये भाजपकडे इनकमिंगला वेग, अमित शाह म्हणाले- निवडणुकीपर्यंत एकट्या पडणार दिदी

    नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसला आणखी एक मोठा झटका बसलाय. टीएमसीचे नाराज मंत्री शुभेन्दु अधिकारी यानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मिदनापूर येथे एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या रॅलीदरम्यान तृणमूलचे मंत्री शुभेन्दु अधिकारी, खासदार सुनिल मंडल आणि  10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात सहा तृणमूलचे, दोन सीपीएमचे, कॉंग्रेस आणि सीपीआयच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये राजकीय इनकमिंग जोरात सुरु आहे.

    भाजपचं ‘मिशन बंगाल’
    ममता बॅनर्जींच्या गडाला अशा प्रकारे भगदाड पाडल्यानंतर अमित शाहंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “काही बडबड्या नेत्यांनी सांगितलं की बंगालमध्ये तृणमूलला कोणीही हारवू शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी असं सांगितलं जायचं की बंगालमध्ये भाजप खातंही खोलू शकणार नाही. पण भाजपने या राज्यात 18 जागांवर विजय मिळवला. आता विधानसभा निवडणूक येईपर्यंत ममता बॅनर्जी एकट्या पडतील.”

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढं म्हणाले की, “भाजपमध्ये आज जे लोक प्रवेश करत आहेत त्यांनी ‘मां माटी मानुष’ या विचारांनी राजकारण सुरु केलं होतं. पण ममता बॅनर्जी यांनी ‘मां माटी मानुष’ ला टोलबाजी, परिवारवाद, तिरस्कारवाद आणि हप्ता वसूलीत रुपांतर केलं. ममता बॅनर्जींनी कॉंग्रेस सोडली. तेही एक पक्षांतरच होतं. आज सगळ्या पक्षातील चांगले लोक भाजपमध्ये येत आहेत. भाजप यावेळी 200 जागा जिंकेल आणि पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करेल.”

    मोदींची प्रशंसा
    शुभेन्दु अधिकारी यांनी रॅलीला संबोधित करताना अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुफान प्रशंसा केली. त्यांनी मोदी हे देशाची ‘आन बान शान’ असल्याचं सांगितलं. शुभेन्दु अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तो ममता बॅनर्जींना एक झटका मानला जातोय. शुभेन्दु अधिकारी यांची बंगालमध्ये 25 ते 30 विधानसभा जागांवर पकड असल्याचं सांगितलं जातंय. त्यांनी 27 नोव्हेंबर रोजी टीएमसीचा राजीनामा दिला होता.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img