More
    HomePoliticsमहाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस

    महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस

    मुंबई : मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो. मात्र मुख्यमंत्री पदाला शोभणारी वक्तव्यं त्यांनी केली. गेल्या वर्षभरात या सरकारने काहीच साध्य केलेलं नाही. सामनाला दिलेल्या मुलाखतीत विकासावर चर्चा नाही तर फक्त धमकवण्यासाठी दिलेली वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी पाहिलेले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. प्रवीण दरेकर यांच्या ‘ही कसली वचनपूर्ती’ या ठाकरे सरकारच्या कारकिर्दीवरच्या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

    फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला शोभणारे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. राग किंवा द्वेषाशिवाय या शपथेचे पालन मुख्यमंत्री करत नाहीयेत. ‘हात धुवून लागेन आणि पाय धुवून मागे लागेन’ ही वक्तव्ये त्यांना शोभत नाहीत, असंही ते म्हणाले.

    ते म्हणाले की, ते कितीही एकत्र आले तरी शेवटी जनतेनं सरकार कसं चाललंय हे पाहिलेलं आहे. हे कितीही एकत्र आले तरी मनाने एकत्र येऊ शकत नाही. तर स्थानिक स्वराज्य संस्थेतही हे एकत्र येत असतील याचा अर्थ आमची ताकद वाढते आहे. विजेच्या प्रश्नावर या सरकारने ऐतिहासिक घुमजाव केलेलं आहे. बदल्यांचे दलाल ज्या प्रकारे फिरतायत अशी अवस्था पूर्वीच्या काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात पण पाहायला मिळाली नव्हती, असं ते म्हणाले.

    आमची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी नाही
    ते म्हणाले की, न्यायालयाच्या या दोन निर्णयामुळे कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन होऊन राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी योग्य उदाहरणं आहेत. पण आमची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्ही रस्त्यावर उतरूयामध्ये कोणावर कारवाई होणार? गृहमंत्री, मुख्यमंत्री की अवैध कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार हे सुनिश्चित झाले पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, पाच वर्षे खुशाल सरकार चालवा, पण गव्हर्नन्स दाखवा. हे सरकार विश्वासघातातून जन्माला आलंय. स्थगिती ही एकमेव या सरकारची उपलब्धी आहे.

    ते म्हणाले की, आरे कारशेडचं सत्य मुंबई भाजप प्रत्येक मुंबईकरांपर्यंत पोहचवणार आहे. काही अधिकारी आपल्या फायद्यासाठी मुख्यमंत्र्यांचा ‘इगो मसाज’ करतायत, असा आरोपही फडणवीसांनी केला.

    अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौत यांच्या सर्व मतांशी आम्ही सहमत नाही
    फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले. काल न्यायालयाचे आलेले दोन निर्णय यात त्यांची कारकीर्द दिसून येते. अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौत यांच्या सर्व मतांशी आम्ही सहमत नाही. पण सरकारविरोधी विचार मांडल्यावर ते चिरडून टाकू याच्याशी आम्ही सहमत नाहीत, असं ते म्हणाले. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने चपराक दिल्याने तरी हे सुधरतील का? की आता न्यायालयांना ‘महाराष्ट्रद्रोही’ ठरवणार? असा सवाल फडणवीसांनी केला.

    read more-

    https://marathi.abplive.com/news/mumbai/devendra-fadnavis-on-uddhav-thackeray-maharashtra-politics-mahavikas-aghadi-832897

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img