More
    HomeEducationमुलांना शाळेत पाठविण्यास पालक अनुत्सुक!

    मुलांना शाळेत पाठविण्यास पालक अनुत्सुक!

    Schools Reopen in Akola पालक मुलांना शाळेत पाठविण्यास फारसे तयार होत नसल्याचे दिसून येत आहे.

    मुलांना शाळेत पाठविण्यास पालक अनुत्सुक!

    ठळक मुद्दे: शाळेत दररोज तीन ते चार तासिका होणार आहेत.ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी पालकांचा आग्रह दिसून येत आहे.

    अकोला: माध्यमिक शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांनी शाळेत यावे, यासाठी शिक्षण विभाग पालकांकडून संमतीपत्र भरून घेत आहे. काही पालक संमतीपत्र भरून देत आहेत तर काही पालक चक्क नकार देत आहेत. कोरोनाच्या पृष्ठभूमिवर पालक मुलांना शाळेत पाठविण्यास फारसे तयार होत नसल्याचे दिसून येत आहे.

    इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभाग पालकांशी संपर्क साधत आहेत आणि मुलांना शाळेत पाठविण्यास सांगत आहे. शाळेत दररोज तीन ते चार तासिका होणार आहेत. एक तासिका ४५ मिनिटांची राहणार आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झालेला नाही. दरराेज कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवावे तरी कसे, असा प्रश्न पालकांना सतावत आहे. मुलांना शाळेत पाठविल्यानंतर त्यांच्या आरोग्याबाबत कोणती काळजी, खबरदारी घेण्यात येणार आहे, याविषयी पालकांच्या मनात साशंकता आहे. शिक्षण महत्त्वाचे असले तरी, जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याकडे पालकांचा कल कमी दिसत आहे. इयत्ता नववी व बारावीचे महत्त्वाचे विषय शाळेत शिकविले जाणार आहेत. हेच विषय ऑनलाइनसुद्धा शिकविण्यात यावे. सध्या तरी ऑनलाइन शिक्षणावरच शिक्षण विभाग व शाळांनी भर द्यावा, असे पालकांचे मत आहे. उद्या मुलांना कोरोनाची लागण झाल्यास, त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न पालक करीत आहेत; परंतु शिक्षण विभाग पालकांच्या जबाबदारीवर मुलांना शाळेत बोलाविण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शिक्षण विभाग, शाळा, मुख्याध्यापक कोणीही घ्यायला तयार नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्यास पालक फारसे उत्सुक दिसून येत नाहीत. शाळांमध्ये विद्यार्थी फिजिकल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे पालन करणार नाहीत, याची जाणीवही पालकांना आहे. त्यामुळेच कोरोनाच्या परिस्थितीत शाळेत जाऊन शिक्षण घेण्यापेक्षा ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी पालकांचा आग्रह दिसून येत आहे.

    या विषयासाठी विद्यार्थ्यांना जावे लागणार शाळेत

    इयत्ता नववी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत काठिण्य पातळीवरचे विषय शिकविण्यात येणार आहेत. इंग्रजी, गणित व विज्ञान विषय ऑनलाइन शिकविण्यात अडचणी येतात. या अडचणी लक्षात घेता, मुलांना शाळांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिकविण्यात येणार आहेत.

    इतर विषय ऑनलाइन शिकविणार

    विद्यार्थ्यांना शाळेत इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांसोबतच इतरही इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, जीवशास्त्र, रसायनशास्त्रासारखे विषयही शिक्षक शिकविणार आहेत; परंतु काही विषय ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा शिकविण्यात येणार आहेत.

    मुलांनी शाळेत यावे. याविषयी आग्रह नाही. कोरोना परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याचा निर्णय पालकांनी घ्यायचा आहे. त्यासाठी आम्ही पालकांकडून संमतीपत्र भरून घेत आहोत. पालकांना ऑफलाइन व ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय आहे. ज्यांना ऑफलाइन शिक्षण घ्यायचे आहे, त्यांना ते उपलब्ध राहील.कोरोनाची भीती अद्याप संपलेली नाही. त्यामुळे मुलांना शाळेत बोलावून शिक्षण देणेही महत्त्वाचे आहे; परंतु मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाने कोणत्या उपाययोजना केल्या, याची माहिती पालकांना द्यावी. नुसतेच संमतीपत्र भरून आम्ही मुलांना शाळेत कोणाच्या आधाराने पाठवायचे. परिस्थिती पाहूनच, मुलांना शाळेत पाठविण्याचा विचार करू.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img